शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘एम्स’ची ओपीडी शनिवारपासून रुग्णसेवेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 22:24 IST

बहुप्रतिक्षेत असलेल्या व राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) बाह्यरुग्ण विभाग (ओपडी) रुग्णसेवेत सुरू होत आहे. याचे डिजिटल उद्घाटन ७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

ठळक मुद्देतूर्तास ‘डे-केअर सेंटर’ : तीन महिन्यानंतर १०० खाटांचा वॉर्ड

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : बहुप्रतिक्षेत असलेल्या व राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) बाह्यरुग्ण विभाग (ओपडी) रुग्णसेवेत सुरू होत आहे. याचे डिजिटल उद्घाटन ७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सुरुवातीला ‘डे-केअर सेंटर’ असून, महिन्याभरात २० खाटा आणि पुढील तीन महिन्यात १०० खाटांची सोय ‘ओपीडी’मध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती ‘एम्स’च्या संचालक, मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी दिली.मिहान येथे २५० एकरमध्ये ‘एम्स’ची इमारत उभारली जात आहे. या वर्षी ‘एमबीबीएस’ची दुसऱ्या बॅचच्या १०० विद्यार्थ्यांना याच इमारतीतून शिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीपासूनच ‘एम्स’ एमबीबीएसचे वर्ग सुरू झाले आहे. परंतु इमारतीचे बांधकाम अपुरे असल्याने मेडिकल कॉलेजमध्येच ५० विद्यार्थ्यांच्या निवासाची व शिक्षणाची सोय करण्यात आली होती. लवकरच यांचेही वर्ग मिहानमधून सुरू होणार आहे. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. दत्ता म्हणाल्या, मेट्रोच्या लोकमान्यनगर ते सीताबर्डी या मार्गाचे लोकार्पण शनिवार ७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत आहे, याच कार्यक्रमात ‘एम्स’च्या ‘ओपीडी’चेही डिजिटल उद्घाटनही होणार आहे. ही ओपीडी शनिवारनंतर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रुग्णसेवेत असेल. येथे उपचारासोबतच काही तपासण्या केल्या जातील. परंतु ही ‘डे-केअर’ सेवा असेल. महिन्याभरानंतर २० खाटा आणि साधारण तीन महिन्यानंतर १०० खाटा ‘ओपीडी’मध्ये उपलब्ध करून दिल्या जातील. या वर्षी एमबीबीएसच्या १०० जागांमधून ९९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यांच्या निवासाची व शिक्षणाचीही सोय मिहान येथेच करण्यात आली आहे. लवकरच मेडिकलमध्ये शिक्षण घेणाºया ५० विद्यार्थ्यांच्या निवासाचीही सोय मिहानमध्ये केली जाईल, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnagpurनागपूर