शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

माता व बालमृत्यू रोखण्यासाठी ‘एम्स’चा पुढाकार; ‘नूरा हेल्थ’सोबत सामंजस्य करार

By सुमेध वाघमार | Updated: April 29, 2023 19:10 IST

Nagpur News ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ने (एम्स) माता व बालमृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने, ‘केअर कंपेनियन प्रोग्राम (सीसीपी) सुरू केला आहे.

सुमेध वाघमारे नागपूर : ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ने (एम्स) माता व बालमृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने, ‘केअर कंपेनियन प्रोग्राम (सीसीपी) सुरू केला आहे. यासाठी ‘एम्स’ने ‘नूरा हेल्थ’सोबत सामंजस्य करार केला आहे. या करारावर तत्कालिन एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी स्वाक्षरी केली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, नूरा हेल्थकडून डॉ. निलेश गावंडे, डॉ. दीपाली ठाकूर, डॉ. तन्मय पठाणी आणि डॉ. नीलेश उपस्थित होते. 

      ‘एम्स’मध्ये दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. यात विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा येथून येणाºया रुग्णांची भर पडत आहे. उपचार करण्यासोबतच आजाराविषयक जनजागृतीसाठी ‘एम्स’ने पुढाकार घेतला आहे. यात ‘केअर कंपेनियन प्रोग्राम’ महत्त्वाचा ठरणार आहे. यात  गर्भवती महिलांना बाळाला स्तनपान कसे करावे, कावीळ या सांरख्या बालकांच्या आजाराची लक्षणे कशी ओळखावी, गर्भधारणेदरम्यान आणि नंतर आईचा आहार कसा असावा, स्वच्छता कशी राखावी, कुटुंब नियोजन आदींची माहिती व प्रात्याक्षिक ‘नूरा हेल्थ’ कडूनदिले जाणार आहे. 

-वडिलांनाही दिले जाईल बाळाला पकडण्याचे प्रशिक्षणया कार्यक्रमांतर्गत वडिलांनी आपल्या नवजात बाळाला कसे पकडावे, वरून दूध देण्याची वेळ आली तर ते कसे पाजावे, बाळांचे लसीकरण, लसीचे महत्त्व, बाळाची आंघोळ कशी घालावी आदींचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. 

-तीन टप्प्यात राबविला जाणार कार्यक्रमे‘एम्स’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीगिरीवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, नूरा हेल्थचे डॉ. नीलेश गावंडे या कार्यक्रमाचे संचालन व नेतृत्व करतील. हा कार्यक्रम तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिला टप्प्यात माता व बाल आरोग्य, दुसºया टप्प्यात जनरल मेडिसीन व सर्जरी तर तिसºया टप्प्यात कार्डिओलॉजी व नेफ्रोलॉजीशी संबंधित रुग्ण असणार आहेत. हा कार्यक्रम तीन वर्षांपासून यवतमाळ मेडिकलमध्ये राबविला जात आहे. या कार्यक्रमामुळे माता व बालमृत्यू कमी करण्यात यश येईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्य