शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

एआयचा केला जातोय असाही दुरुपयोग, महापुरुषांचे आक्षेपार्ह व्हिडीओ 'व्हायरल'

By योगेश पांडे | Updated: July 5, 2025 19:23 IST

सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न : सायबर सेलचे 'मॉनिटरिंग' कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजकाल 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स'चा उपयोग सर्वच क्षेत्रांत वाढला असताना काही समाजकंटकांकडून याचा दुरूपयोग देखील सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 'एआय'च्या माध्यमातून महापुरुषांचे विविध गाण्यांवर नाच करतानाचे व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहेत. त्यात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचादेखील समावेश आहे. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा हा सरळसरळ प्रयत्न आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांच्या 'सायबर सेल'कडून आक्षेपार्ह व्हिडीओजवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असल्याचा दावा करण्यात येतो. मात्र, असे व्हिडीओ व्हायरल होत असताना त्यांचे 'मॉनिटरिंग' कुठे गेले असा सवाल उपस्थित होत आहे.

'लोकमत'ला मिळालेल्या माहितीनुसार अशा पद्धतीचे व्हिडीओ नागपुरातदेखील 'व्हायरल' होत आहेत. फेसबुकच्या 'अल्गोरिदम'चा वापर करून काही समाजकंटकांकडून याबाबत तयार करण्यात आलेल्या रिल्स व व्हिडीओ फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल माध्यमांवर शेअर करण्यात येत आहे.

'लोकमत'ने याची चाचपणी केली असता यासंदर्भातील एका खातेधारकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असे व्हिडीओ व्हायरल करण्यात येत असल्याची बाब समोर आली. 'ठाकूर_रियासत' या नावाने संबंधित व्यक्तीचे खाते आहे. खातेधारक नागपूरच्या बाहेरचे असून, ते नेमके कुठले आहेत याची कल्पना येत नसली तरी नागपुरातील अनेक जणांच्या फेसबुक व इन्स्टा रिल्समध्ये संबंधित खातेधारकाने तयार केलेला आक्षेपार्ह व्हिडीओ दिसून येत आहे. 'शजमल ४५५५' तसेच 'डायरेक्ट माईंड फ्रेश५०'या इन्स्टा खातेधारकांकडून महात्मा गांधी यांचा नाच करतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

'एआय'च्या माध्यमातून विकृत रूप

  • 'एआय टूल्स'चा वापर करून महापुरुषांचे अॅनिमेटेड व्हर्जन तयार करण्यात येतात. त्यानंतर महापुरुष एखाद्या रॉक गाणे, लावणी किंवा इतर गाण्यांवर नाचतानाचे स्वरूप दिले जाते. त्यात नाचाचे 'स्टेप्स' हे अश्लाघ्य व आक्षेपार्ह पद्धतीचे बनविण्यात येतात.
  • महात्मा गांधी यांचा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच एका तरुणीसोबत नाचतानाचा बनविण्यात आला आहे तर बाबासाहेब आंबेडकर यांचा तर व्हिडीओ तर कुटुंबियांसोबत बसून ऐकता येणार नाहीत अशा गाण्यांवर तयार करण्यात आला आहे.
  • एका व्हिडीओत चक्क एक विकृत व्यक्ती बाबासाहेबांना 'हॉलिवूड स्टाईल'ने मारत असल्याचेदेखील दाखविण्यात आले आहे. असे व्हिडीओ बनवून सामाजिक तेढ निर्माण करण्याचाच प्रयत्न दिसून येत आहे.

पोलिसांचा दावा, तक्रार झाल्यास कारवाईयासंदर्भात सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीराम सुतार यांना संपर्क केला असता अशा व्हिडीओजबाबत एकही तक्रार आली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, तक्रार आल्यावर किंवा आमच्या पथकाला असा आक्षेपार्ह व्हिडीओ आढळला तर संबंधितांवर लगेच कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :nagpurनागपूरArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स