शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब

By आनंद डेकाटे | Updated: December 22, 2025 19:38 IST

IIM नागपूर परिषदेत संशोधन आणि रेल्वेमधील एआयच्या भूमिकेवर सखोल मंथन

आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरामुळे कार्यक्षमता, गती आणि निर्णयक्षमता निश्चितच वाढू शकते; मात्र एआय कधीही मानवाची शिकण्याची प्रक्रिया, विवेक, नैतिकता आणि जबाबदारी यांची जागा घेऊ शकत नाही, या मतावर सोसायटी ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंट (सोम) च्या २८ व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्व तज्ज्ञांनी एकमताने शिक्कामोर्तब केले. ही परिषद भारतीय प्रबंध संस्थान (आय. आय. एम.) नागपूर येथे पार पडली. परिषदेत शिक्षण क्षेत्रातील संशोधन तसेच भारतीय रेल्वेसारख्या सार्वजनिक व्यवस्थांमध्ये एआयचा जबाबदारीने कसा वापर करता येईल, यावर सविस्तर चर्चा झाली.

देश-विदेशातील वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञ, उद्योगजगताचे प्रतिनिधी आणि धोरणकर्ते या परिषदेत सहभागी झाले होते. ज्ञाननिर्मिती आणि सार्वजनिक प्रणालींमध्ये एआयचा समतोल आणि नैतिक वापर कसा करावा, यावर विचारमंथन करण्यात आले. परिषदेतील मुख्य आकर्षण ठरलेले ‘डायरेक्टर्स पॅनल’ आय. आय. एम. नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले. या सत्रात संशोधन आणि शैक्षणिक प्रकाशनांवर एआयचा होणारा परिणाम चर्चिला गेला. आय. आय. एम. मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी हे व्हर्च्युअली सहभागी झाले, तर एस. पी. जे.आय. एम. आर. मुंबईचे अधिष्ठाता डॉ. वरुण नागराज, आय. आय. एम. इंदूरचे माजी संचालक प्रा. एन. रविचंद्रन तसेच टोयोटा इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष व पूर्णवेळ संचालक प्रा. टी. आर. परशुरामन यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.

पॅनल सदस्यांनी सांगितले की माहिती शोधणे, संदर्भ गोळा करणे आणि लिखित मजकूर मांडणे यांसारख्या कामांमध्ये एआय उपयुक्त ठरू शकतो; मात्र शिकणे आणि विचार करण्याची मूलभूत प्रक्रिया दुर्लक्षित करता येणार नाही. डॉ. वरुण नागराज यांनी नमूद केले की संशोधनाची सुरुवात शिकण्यापासून होते आणि एआयवर अतिविश्‍वास, विशेषतः तरुण संशोधकांची निर्णयक्षमता कमी करू शकतो. प्रा. मनोज कुमार तिवारी यांनी स्पष्ट केले की एआयमुळे वेग आणि कार्यक्षमता वाढू शकते, पण संशोधनातील मानवी जवाबदारीला कोणताही पर्याय नाही.

प्रा. एन. रविचंद्रन म्हणाले की, गहन वाचनामुळे विषयाची अधिक चांगली समज विकसित होते. प्रा. टी. आर. परशुरामन यांनी उद्योग क्षेत्र एआयचा सर्वात मोठा लाभार्थी असल्याचे नमूद करत, संशोधकांनी एआयचा पर्याय म्हणून नव्हे तर शक्तिशाली सहाय्यक म्हणून वापर करावा. परिषदेच्या औपचारिक उद्घाटन सत्रात आयआयएम नागपूरचे संचालक प्रा. भीमराया मेत्री, सोम चे अध्यक्ष प्रा. राहुल मराठे तसेच ओएनजीसी ग्रीनचे मुख्य परिचालन अधिकारी डॉ. हर्ष नुपुर जोशी यांनी आपले विचार मांडले. प्रा. आलोक कुमार सिंह, अधिष्ठाता– एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन प्रोग्राम्स, यांनी प्रस्तावना केली, तर प्रा. निकुंज कुमार जैन, चेअरपर्सन, एक्झिक्युटिव्ह एमबीए इन एनर्जी मॅनेजमेंट, यांनी आभार प्रदर्शन केले. ओएनजीसी लिमिटेडचे संचालक (रणनीती व कॉर्पोरेट व्यवहार) अरुणांशु सरकार यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे आपले विचार व्यक्त केले.

चालकविरहित गाड्या चालवण्याची कोणतीही योजना सध्या नाही!

रेल्वे प्रवास अधिक सुलभ व्हावा, योग्य वेळी योग्य मदत मिळावी यासाठी एआयची भूमिका महत्त्वाची असली, तरी चालकविरहित गाड्या चालवण्याची कोणतीही योजना सध्या नाही, असे भारतीय रेल्वेवर केंद्रित स्वतंत्र परिसंवादात वक्त्यांनी स्पष्ट केले. प्रा. अजिंक्य टांकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेत मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग, क्रिसचे महाव्यवस्थापक (इंडस्ट्रियल कम्प्युटिंग) डॉ. ज्ञानेश त्रिपाठी तसेच भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे संचालक राहुल पाचोरी सहभागी झाले. वक्त्यांनी स्पष्ट केले की क्रू व्यवस्थापन, आरक्षण प्रणाली आणि संचालन नियोजन यांसारख्या क्षेत्रांत एआय उपयुक्त ठरू शकतो; मात्र निकट भविष्यात लोको पायलटांच्या जागी एआय येणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : AI: Powerful Assistant, Not a Replacement for Human Brain, Experts Affirm

Web Summary : AI enhances efficiency but cannot replace human learning, ethics, and responsibility, experts agreed at the Society of Operations Management conference in Nagpur. Discussions covered AI's ethical use in education and public systems like Indian Railways. Driverless trains are not currently planned.
टॅग्स :nagpurनागपूरArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स