शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून अगोदर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ॲक्शन मोडवर, विकासप्रकल्पांचा घेतला आढावा

By योगेश पांडे | Updated: June 18, 2024 17:01 IST

प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेत पावसाळ्यात याचा नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या केल्या सूचना

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मान्सूनच्या पहिल्याच पावसात मनपाच्या तयारीची पोलखोल झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील विविध विकासप्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी या प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेतली तसेच पावसाळ्यात याचा नागरिकांना त्रास होणार नाही यादृष्टीने पावले उचलण्याची सूचना केली.

सोमवारी आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना मन:स्ताप झाला. मागील वर्षी एकाच दिवसात झालेल्या विक्रमी पावसामुळे शहरातील पॉश वस्त्यांमध्ये पाणी शिरून हाहा:कार उडाला होता. यावर्षी तशी स्थिती येऊ नये यासाठी अंबाझरी तलावाजवळ कामाला सुरुवात झाली आहे. शहरात अनेक विकासकामे सुरू असून आचारसंहितेचा त्यांना फटका बसला होता. अनेक सिमेंट रस्ते अर्धवट अवस्थेत आहेत. पावसाळ्यात या सर्व ठिकाणी नागरिक व प्रशासनाची परीक्षा होणार आहे.

या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी रविभवन येथे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकासकामांचा आढावा घेतला. या बैठकीत नागनदी प्रकल्प सद्यस्थिती, ऑरेंज सिटी स्ट्रीटवरील सर्व प्रस्तावित प्रकल्प, दहीबाजार, लोहाओळी, पोहाओळ, अनाज बाजार, कॉटन मार्केट, संत्री मार्केट, नेताजी मार्केट, डिक दवाखाना या विकास प्रकल्पांची सद्यस्थिती, ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर सद्यस्थिती, रामजी पहेलवान रस्ता, एलआयसी चौक, जुना भंडारा रोड येथील भूसंपादन, रेल्वे स्टेशन समोरील रस्ता व दुकानदारांचे पुनर्वसन, कल्याणेश्वर मंदिर पुनर्विकास प्रकल्प, गोकुळपेठ बाजार पुनर्विकास प्रकल्प, स्मार्ट व्हिलेज प्रकल्प या विषयांवर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. काही प्रकल्पांमध्ये उणीवा असून त्यामुळे जनतेत नाराजी आहे. त्या उणीवा दूर करून कामाला गती देण्याची सूचना गडकरी यांनी केली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूरmonsoonमोसमी पाऊस