शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाचे ‘अ‍ॅग्रो टुरिझम’!

By admin | Updated: July 6, 2015 03:01 IST

आतापर्यंत केवळ शेतीविषयक शासकीय योजना राबविणाऱ्या कृषी विभागाने आता मात्र ‘अ‍ॅग्रो टुरिझम’कडे वाटचाल सुरू केली आहे.

हालचाली सुरू : ‘कदिमबाग’ होणार पर्यटनस्थळ जीवन रामावत नागपूरआतापर्यंत केवळ शेतीविषयक शासकीय योजना राबविणाऱ्या कृषी विभागाने आता मात्र ‘अ‍ॅग्रो टुरिझम’कडे वाटचाल सुरू केली आहे. यासाठी नागपूर कृषी विभागाने सिव्हिल लाईन्स परिसरातील कदिमबाग नर्सरीची निवड केली आहे. येथे ‘अ‍ॅग्रो टुरिझम’ विकसित करण्याचा विचार केला जात आहे. यातून नागपूरकरांना आता शहराच्या मध्यभागी ‘कृषी पर्यटनाचा’ आनंद लुटता येणार आहे.कृषी विभागाने सिव्हिल लाईन्ससारख्या प्रशस्त परिसरात ‘कदिमबाग’ नर्सरी विकसित केली आहे. त्यामुळे येथील ‘अ‍ॅग्रो टुरिझम’ सर्वांसाठी सोयीचे ठरणार आहे. या नर्सरीत आंबा, चिकू, पेरू , आवळा, लिंबू, सीताफळ, चिंच, बोर, संत्रा व मोसंबीच्या बागेसह आधुनिक शेती विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे येथे वर्षभर हिरवेगार निसर्गरम्य वातावरण अनुभवायला मिळते. तसेच कृषी विभागाने येथे सिमेंटचा पक्का रस्ता तयार करू न त्यावर स्ट्रिट लाईट लावले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथे मनमोहक दृश्य पाहायला मिळते. शिवाय या बागेत एक शितला माता मंदिर असून, तेथे रोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे येथील पर्यटनाला धार्मिक जोड सुद्धा मिळणार आहे. कृषी विभागाने येथील संपूर्ण परिसराला सुरभा भिंत बांधली आहे. तसेच लवकरच येथे एक भव्य प्रवेशव्दार सुद्धा तयार केले जाणार आहे. अलिकडे पर्यटकांचा कृषी पर्यटनाकडे ओढा वाढत आहे. परंतु विदर्भात अजूनपर्यंत ‘कृषी पर्यटन’ फारसे विकसित झालेले नाही. उलट पश्चिम महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ‘कृषी पर्यटन’ विकसित करू न, उत्पन्नाचा स्रोत तयार केला आहे. विदर्भात मात्र तसा कुठेही प्रयोग झालेला दिसून येत नाही. कृषी विभागाने सुद्धा येथील शेतकऱ्यांना त्यासाठी कधीच प्रोत्साहित केलेले नाही. मात्र केंद्रीय कृषी मंत्रालयातील फलोत्पादन संचालक अतुल पाटणे यांनी अलिकडेच ‘कदिमबाग’ येथे दिलेल्या भेटीदरम्यान येथे ‘अ‍ॅग्री टुरिझम’ विकसित करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती एका वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार कृषी विभागाने या हालचाली सुद्धा सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे, यातून कृषी विभागाला आर्थिक उत्पन्नाचा मोठा स्रोत मिळणार आहे.‘चिकू’ नेपाळलाकृषी विभागाने येथील बागेत आंबा, चिकू, आवळा, पेरु, संत्रा, मोसंबी, लिंबू, सीताफळ, चिंच व बोरासह विविध झाडांच्या कलमांसाठी ८९५ पेक्षा अधिक मातृवृक्ष तयार केले आहेत. यापासून दरवर्षी सुमारे २४ ते २५ हजार कलमांची विक्री केल्या जात आहे. शिवाय यंदा येथील चिकूच्या कलमा थेट नेपाळपर्यंत पोहोचल्याची माहिती येथील कृषी अधिकाऱ्यांनी दिली. या बागेत लंगडा, दशेरी, केशर, रत्ना, तोतापुरी, मल्लिका व आम्रपाली जातीच्या आंब्यासह कालीपत्ती व क्रिकेटबॉल चिकू, एन ए-४/७/१०, आनंद-१ व चकैया आवळा, लखनौ -४९ व ललित पेरु, काटोल गोल्ट मोसंबी, बालानगर सीताफळ व प्रतिष्ठान चिंचीच्या झाडांसह उमरान, कडाका, कालागोला आणि सफरचंद जातीच्या बोरांची झाडे येथे पाहायला मिळतात. याशिवाय येथे गांडूळ खताचा प्रकल्प व पॉलिहाऊ समध्ये ‘जरबेरा’ची फुलशेती केली जात आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या मते, सध्या येथील नर्सरी, फुलशेती व गांडुळ खताच्या प्रकल्पांपासून वर्षाला सुमारे साडेसहा लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे. पर्यटनाला वाव कृषी पर्यटनासाठी येथे सर्व गोष्टी अनुकूल आहेत. काहीच दिवसांपूर्वी येथे सिमेंट रस्ता बांधण्यात आला असून, त्यावर स्ट्रीट लाईट लावण्यात आले आहेत. शिवाय येथील संपूर्ण शेती आधुनिक पद्धतीने विकसित केली आहे. त्यामुळे येथे ‘अ‍ॅग्रो टुरिझम’ला फार मोठा वाव आहे. परंतु यासोबतच येथे कर्मचाऱ्यांचा फार मोठा अभाव आहे. मागील दोन वर्षांत या नर्सरीचा संपूर्ण कायापालट केला आहे. परंतु त्या परिश्रमाच्या मोबदल्यात मला शाबासकी ऐवजी बदलीचे बक्षीस मिळाले आहे. अनिल महंतकृषी पर्यवेक्षक, कदिमबाग