शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाराजबागला मान्यता मिळण्यासाठी कृषी विद्यापीठाचे अपील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 21:28 IST

विदर्भाची शान असलेल्या महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या मान्यतेचे नूतनीकरण व्हावे, याकरिता पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणकडे अपील दाखल केले आहे. विद्यापीठाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.

ठळक मुद्देहायकोर्टात माहिती : जनहित याचिकेचे केले समर्थन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भाची शान असलेल्या महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या मान्यतेचे नूतनीकरण व्हावे, याकरिता पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणकडे अपील दाखल केले आहे. विद्यापीठाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणने महाराजबाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता काढून घेतल्यामुळे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जुनघरे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, विद्यापीठाने वरील माहिती दिली. तसेच, याचिकाकर्त्याचे समर्थन करीत असल्याचे सांगून या प्रकरणात दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे न्यायालयाने प्रकरणावरील सुनावणी तीन आठवडे तहकूब केली.१२५ वर्षे जुने महाराजबाग प्राणिसंग्रहालय नागपूरच्या हृदयस्थळी वसलेले आहे. हे विदर्भातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात. राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय धोरण-१९९८ अनुसार केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणने देशभरातील प्राणी संग्रहालयाचा विस्तार व देखभालीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु, प्राधिकरण या धोरणाच्या विरोधात जाऊन निर्णय घेत आहे. महाराजबाग प्राणिसंग्रहालय पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत येते. विद्यापीठाला महाराजबागचा विस्तार व देखभालीसाठी निधीची चणचण भासत आहे. त्यामुळे विद्यापीठाने प्राधिकरणकडे निधीसाठी धाव घेतली होती. प्राधिकरणने विद्यापीठाला निधी दिला नाही. उलट महाराजबाग प्राणिसंग्रहालयाची मान्यता काढून घेतली, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले तर, विद्यापीठातर्फे अ‍ॅड. उज्ज्वल देशपांडे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Maharajbagh Nagpurमहाराजबाग नागपूरHigh Courtउच्च न्यायालय