शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांतील मंदीवरुन ‘भामसं’ केंद्राविरोधात आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 13:59 IST

देशातील खासगीकरण बंद करुन ‘नीती’ आयोगाचे पुनर्गठन करण्याची मागणी ‘भामसं’तर्फे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देखासगीकरण देशहितविरोधी असल्याची भूमिका ‘नीती’ आयोगाच्या पुनर्गठनाचा आग्रह

योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीचा फटका अर्थव्यवस्थेला बसत असून उद्योगांमध्ये मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय मजदूर संघाने या मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्राची आर्थिक धोरणं सपशेल अपयशी ठरली असून खासगीकरणाचा आग्रह भोवतो आहे. देशातील खासगीकरण बंद करुन ‘नीती’ आयोगाचे पुनर्गठन करण्याची मागणी ‘भामसं’तर्फे करण्यात आली आहे.‘भामसं’च्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक नुकतीच दिल्ली येथे पार पडली. या बैठकीदरम्यान देशातील आर्थिक संकटांवर सखोल चर्चा करण्यात आली. केंद्र शासनाने अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी विविध योजना राबविल्या. परंतु याचा फारसा फायदा झालेला नाही. परकीय गुंतवणूकीवर अवलंबून राहण्याच्या भूमिकेमुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना फटका बसला. आॅटोमोबाईल क्षेत्रात तर प्रचंड मंदी आली आहे. याशिवाय सरकारने विविध क्षेत्रांमध्ये खासगीकरणाला सुरुवात केली आहे. खासगीकरणाचा हा घाट देशहित विरोधीच आहे. यामुळे उत्पादन क्षेत्राचे नुकसान होत आहे. नफ्यामध्ये असणाऱ्या सार्वजनिक आस्थापनांचे खासगीकरण करणे हे तर सरकारचे दिशाहीन धोरण आहे, अशी भूमिका ‘भामसं’तर्फे मांडण्यात आली आहे.‘नीती’ आयोगाकडून धोरण निश्चित करताना विविध ‘ट्रेड युनियन’सह भागभांडवलदारांशी कुठलीही चर्चा करण्यात येत नाही. परंतु परदेशी ‘लिंक’ असलेल्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येते. हे चित्र अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही. ‘नीती’ आयोगाचे पुनर्गठन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘भामसं’चे सरचिटणीस विर्जेश उपाध्याय यांनी केले.

‘ऑटोमोबाईल’ क्षेत्राला दिलासा हवासद्यस्थितीत देशातील ‘ऑटोमोबाईल’ क्षेत्र संकटात आहे. यासाठी कर्जाच्या अटी व नियम शिथिल करणे, ‘जीएसटी’ दर घटविणे, ‘ई’ वाहनांसंबंधित असलेला संभ्रम दूर करणे यासारखी पावले सरकारने त्वरित उचलायला हवी. या क्षेत्राला दिलासा देणारे निर्णय त्वरित घ्यायला हवे, अशी मागणी ‘भामसं’तर्फे करण्यात आली आहे.भामसं च्या इतर मागण्यासार्वजनिक क्षेत्रांचे खासगीकरण बंद करावेसरकारने देशात रोजगारनिर्मितीवर भर द्यावाकुठल्याही सुधारणा करताना ‘ट्रेड युनियन्स’सह विविध संघटनांना विश्वासात घ्यावेतंत्रज्ञान आयोगाची स्थापना करावी१९९१ नंतरच्या उदारीकरणाच्या परिणामावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी

टॅग्स :Governmentसरकार