शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

वयाच्या ५५व्या वर्षी ‘अल्झायमर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 1:25 AM

ज्या लोकांचे वय ६५ वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा लोकांना अल्झायमर झाल्याचे आढळून येते. या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘डेमेन्शिया’ म्हटले जाते. मानसिक प्रक्रिया मंद होत जाणारा हा आजार ....

ठळक मुद्देअयोग्य जीवनशैलीचा परिणाम : शंभरात पाच टक्के रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या लोकांचे वय ६५ वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा लोकांना अल्झायमर झाल्याचे आढळून येते. या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘डेमेन्शिया’ म्हटले जाते. मानसिक प्रक्रिया मंद होत जाणारा हा आजार अलीकडच्या काळात ५५ ते ६० या वयोगटातही दिसून येऊ लागला आहे. याला अयोग्य जीवनशैली कारणीभूत आहे. सोबतच वैद्यकीय सोयीसुुविधा व आजाराबद्दलची जागरूकता वाढल्याने वृद्ध मोठ्या संख्येत दिसून येत आहेत. आयुष्य जेवढे वाढते, डिमेन्शियाच्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.अल्झायमर मेंदूच्या पेशी नष्ट करतो, त्यामुळे स्मृती, विचार आणि वागणूक यांच्यात इतकी तीव्र समस्या येते की काम किंवा सामाजिक जीवन विस्कळीत होते. अल्झायमर हा काळानुसार वाढतच जातो आणि तो जीवघेणा ठरतो. स्मृतिभ्रंशाचं हे सर्वात सामान्य स्वरूप आहे (स्मृती नष्ट होणे) आणि इतर बौद्धिक क्षमता इतकी समस्याग्रस्त होते की दैनंदिन जीवन गडबडून जाते. व्हिटामिन्स, मिनरर्ल्स, मेटोबॉलिझमची कमतरता किंवा अपघातामुळे मेंदूला आलेली जखम, मेंदूच्या रक्तवाहिन्यांचे आजार तसेच मेंदूच्या रक्तवाहिन्यांमधील सूक्ष्म बदल मोठ्या प्रमाणावर घडल्याने डिमेन्शिया होतो. लोकसंख्येमध्ये वृद्धांचे प्रमाण वाढतच आहे.लठ्ठ लोकांमध्ये हा आजार सामान्यनियमित व्यायाम केल्याने, उच्च रक्तदाब-मधुमेह-कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळविल्यास आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सोडल्यास याचा फायदा होतो. लठ्ठ लोकांमध्ये हा आजार मोठ्या संख्येत दिसून येतो. दारूचे जास्त प्रमाणात सेवनही टाळणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.अल्झायमरची लक्षणेअलीकडेच वाचलेले लक्षात न राहणे.दिवसभराची कामेदेखील अवघड वाटणेघरकामातील स्वयंपाक कसा करावा यादेखील गोष्टी अवघड वाटणेअल्झायमर असलेल्यांना अगदी सोपे शब्द किंवा त्याचे पर्यायदेखील आठवत नाहीत.कधीकधी तोंडधुण्याच्या ब्रशला काय म्हणतात हे आठवत नाही.अल्झायमर असणाºयांना त्यांच्या स्वत:च्या शेजारच्या घरातदेखील हरवल्यासारखे होते.अल्झायमर असणाºयांचे कपडे घालणे बिघडते.आकडे विसरणे व ते कसे वापरायचे ते न आठवणे.अल्झायमर असलेल्या व्यक्ती वस्तू कुठेतरी ठेवतात व त्या नंतर शोधत राहतात.अशा व्यक्तीचे स्वभाव अचानक बदलतात.अल्झायमर झालेली व्यक्ती एकलकोंडी बनते, ती टीव्ही समोर तासनतास बसून राहते, झोप काढत राहते किंवा रोजची कामेदेखील व्यवस्थित करत नाहीत.