शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा ‘तारीख पे तारीख’

By admin | Updated: July 6, 2017 02:27 IST

फौजदारी खटले चालविण्याचा दांडगा अनुभव, तरबेज व निष्णात असलेल्या १२ सरकारी वकिलांचा ३० जूनपासून कार्यकाळ संपल्याने

राहुल अवसरे। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फौजदारी खटले चालविण्याचा दांडगा अनुभव, तरबेज व निष्णात असलेल्या १२ सरकारी वकिलांचा ३० जूनपासून कार्यकाळ संपल्याने आणि त्यांच्या रिक्त जागांची तूर्त भरपाई न झाल्याने जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या बहुतांश खटल्यांच्या कामकाजावर परिणाम झालेला असून, पुन्हा ‘तारीख पे तारीख’ची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच काहीच दिवसांपूर्वी नियुक्त झालेल्या नवख्या सरकारी वकिलांची अचानक वाढलेल्या कामाच्या बोजामुळे तारांबळ उडालेली आहे. ३० जूनपर्यंत जिल्हा न्यायालयात ३४ सरकारी वकील होते. तूर्त १२ सरकारी वकिलांचा कार्यकाळ संपल्याने, २२ सरकारी वकील सध्या कार्यरत आहेत. २२ सत्र न्यायालये असून, त्यात ६ तदर्थ न्यायालये आहेत. कार्यकाळ संपलेल्या वकिलांमध्ये दीपक कोल्हे, वसंत नरसापूरकर, अजय निकोसे, राजेंद्र मेंढे, गिरीश दुबे, रवींद्र भोयर, राम अनवाणे, अजय लांबट, प्रशांत भांडेकर, कल्पना पांडे, माधुरी मोटघरे आणि सुनीता खोब्रागडे यांचा समावेश आहे. सरकारी वकिलांपैकी दीपक कोल्हे, वसंत नरसापूरकर, कल्पना पांडे यांनी चालविलेल्या खून खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे. रवींद्र भोयर यांनी देशात गाजलेला अक्कू यादव खून खटला चालविलेला आहे. अपसंपदेच्या प्रकरणात गिरीश दुबे यांनी सरकारची जबरदस्त बाजू मांडल्याने दीपक बजाज यांचा जामीन अर्ज वारंवार फेटाळल्या गेला आहे. राजेंद्र मेंढे यांनी लखोटिया बंधू खून खटला गाजविला आहे. प्रशांत भांडेकर हे खून खटला चालविण्यात तरबेज आहेत. त्यांनी चालविलेल्या बहुतांश प्रकरणात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. अजय निकोसे यांनी सरकारची खंबीर बाजू मांडून अ‍ॅट्रॉसिटीची प्रकरणे गाजविली आहेत. सुनीता खोब्रागडे आणि माधुरी मोटघरे यांनी महिलांविरुद्ध अत्याचाराचे खटले यशस्वीपणे चालविले आहेत. या सरकारी वकिलांच्या रिक्त जागी अन्य कोणाच्याही नियुक्त्या जरी झाल्या तरी त्यांचा अनुभव लक्षात घेता, त्यांच्या रिक्त जागांची भरपाई अलीकडच्या काळात शक्य नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. कार्यकाळ संपताच या सरकारी वकिलांनी आपले काम थांबविल्याने सुरू असलेल्या खटल्यातील आरोपींना पुढची तारीख देण्यात आलेली आहे. अर्थात सुरू असलेले खटले तूर्त थांबलेले आहेत. जामिनासाठी असलेली प्रकरणे सध्या कार्यरत असलेल्या सरकारी वकिलांकडे सोपविण्यात आलेली असून, प्रत्येकावरील कामाचा बोजा वाढलेला आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील समितीने जिल्हा सरकारी वकिलांच्या निवडीसाठी मुलाखती घेतल्या होत्या. त्यात शंभरावर लोकांची निवड झालेली होती. त्यापैकीच वकिलांच्या तुकड्या-तुकड्यात नियुक्त्या केल्या जात असल्याचे सूत्राकडून कळते. दरम्यान प्रस्तुत प्रतिनिधीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांच्याशी बातचित केली असता त्यांनी सांगितले की, बारा सरकारी वकिलांचा कार्यकाळ संपल्याने न्यायालयीन कामकाजावर काहीसा परिणाम झालेला असून लवकरच नवीन वकिलांच्या नियुक्त्यांची यादी न्याय व विधी विभागाकडून येण्याची शक्यता आहे.