नागपूर : कोरोनामुळे रेल्वे बोर्डाने मार्च २०२० पासून नियमित रेल्वेगाड्या बंद करून स्पेशल रेल्वेगाड्या सुरू केल्या होत्या. स्पेशल गाड्यांमध्ये प्रवाशांना अधिक प्रवासभाडे देऊन प्रवास करावा लागत होता; परंतु आता दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने काही पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करून प्रवाशांना दिलासा दिला आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ०८८०२ गोंदिया-बल्लारशाह पॅसेंजर स्पेशल २८ सप्टेंबरपासून सकाळी ७.४० वाजता, ०८८०१ बल्लारशाह-गोंदिया २८ सप्टेंबरपासून दुपारी २.१५ वाजता, ०७८०३ गोंदिया-कटंगी २८ सप्टेंबरपासून सकाळी ९ वाजता, ०७८०४ कटंगी-गोंदिया २८ सप्टेंबरपासून सकाळी ११.४५ वाजता, ०७८०७ गोंदिया-कटंगी २९ सप्टेंबरपासून सायंकाळी ६.४० वाजता, ०७८०८ कटंगी-गोंदिया २९ सप्टेंबरपासून रात्री ९.१० वाजता, ०७८११ तुमसर-तरोडी २९ सप्टेंबरपासून पहाटे ४.१५ वाजता, ०७८१२ तरोडी-तुमसर २९ सप्टेंबरपासून सकाळी ५.५५ वाजता, ०८७५४ इतवारी-रामटेक २८ सप्टेंबरपासून सायंकाळी ७.१० वाजता, ०८७५५ रामटेक-नागपूर २८ सप्टेंबरपासून रात्री ९.३० वाजता, ०८७५६ नागपूर-रामटेक २९ सप्टेंबरपासून पहाटे ५.२५ वाजता आणि ०८७५१ रामटेक-इतवारी २९ सप्टेंबरपासून सकाळी ७.३५ वाजता सुटणार आहे. प्रवाशांनी या पॅसेंजर रेल्वेगाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाने केले आहे.
..............