शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

‘नीट’च्या महाघोटाळ्यानंतर मॅनेजमेंट कोट्यातून गंड्याचा फंडा

By योगेश पांडे | Updated: January 23, 2025 23:52 IST

आरोपी परिमल कोतपल्लीवारवर झाली होती सीबीआयची कारवाई : नागपूर पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाढली हिंमत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नीटमध्ये कमी गुण मिळालेल्या दोन मुलींचे मॅनेजमेंट कोट्यातून मेडिकलमध्ये ॲडमिशन करून देण्याची बतावणी करून त्यांची ७५ लाख ७५ हजारांनी फसवणूक करण्यात आलेल्या प्रकरणाचे धागेदोरे खोलवर रुजलेले आहेत. या प्रकरणाचा सूत्रधार आर. के. एज्युकेशनचा संचालक परिमल कोतपल्लीवार विरोधात सव्वातीन वर्षांअगोदर सीबीआयने कारवाई केली होती. देशभरातील ‘नीट’च्या महाघोटाळ्यात तो सहभागी होता. मात्र या प्रकरणात लॉकअपमधून बाहेर येताच त्याने मॅनेजमेंट कोट्यातून वैद्यकीय अभ्यासक्रमाचा फंडा समोर करत गंडा घालण्यास सुरुवात केली. ‘लोकमत’नेच त्याच्या महाघोटाळ्याच्या ‘मोडस ऑपरेंडी’वर प्रकाश टाकला होता.

परिमल व त्याच्या सहकाऱ्यांनी पाँडिचेरी येथील श्रीलक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे प्रवेश मिळवून देतो अशी बतावणी करून दोन पालकांना ७५ लाखांनी गंडविले. या प्रकारामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशाच्या नावाखाली फसवणुकीचा गोरखधंदा परत उघडकीस आला आहे. याच कोतपल्लीवारने देशपातळीवर नीटचा महाघोटाळा केला होता. नीट परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी लाखो रुपये उकळून डमी उमेदवार बसविण्याचे हे रॅकेट होते. २०२१ मध्ये सीबीआयने याचा भंडाफोड केला होता व परिमलला अटक केली होती. तेथून सुटताच परिमलने नवीन जागेत कार्यालय उघडून परत मेडिकलच्या प्रवेशाचा गोरखधंदा सुरू केला होता. मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली त्याने पॅकेज प्रणालीच सुरू केली होती. याअंतर्गत तो ४० लाख, ५० लाख, ७५ लाख असे पॅकेजेसच पालकांना सांगत असे.

कार्यालयाचा पत्ता बदलला, मात्र गोरखधंदा तसाचपरिमलने नीटचा महाघोटाळा केला तेव्हा त्याचे कार्यालय नंदनवन मुख्य मार्गाजवळ होते. तेथे सीबीआयने धाडदेखील टाकली होती. काही महिन्यांनी त्याने टेलिफोन एक्सचेंज चौकात कार्यालय सुरू केले. त्याचे एजंट्स देशभरात कार्यरत होते व त्यांच्या माध्यमातून कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून ते प्रवेशासाठी इच्छुक पालकांना हेरायचे. एकीकडे ‘नीट’मध्ये चांगले गुण मिळावे यासाठी मेहनत करून विद्यार्थी तयार करत असताना शॉर्टकट प्रवेशाचे आमिष दाखवत परिमलने मॅनेजमेंट कोट्याच्या नावाखाली हे रॅकेट सुरू केले.

अनेक वर्षांपासून सक्रिय, पोलिस यंत्रणेचे दुर्लक्षज्याच्यावर सीबीआयची कारवाई झाली आहे त्या व्यक्तीने शहरातील मोक्याच्या ठिकाणी कार्यालय उघडले असल्याची पोलिसांना माहिती होती. मात्र पोलिसांनी त्याची चौकशी करण्याची तसदीदेखील घेतली नाही. परिमल वैद्यकीय प्रवेशाच्या गैरप्रकारांमध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय असून २०१५ सालीदेखील परिमलला अशाच प्रकरणात अटक झाली होती. २०१५ साली देशाच्या शिक्षणवर्तुळाला हादरविणाऱ्या ‘एआयपीएमटी’ परीक्षेत ‘हायटेक कॉपी’च्या ‘रॅकेट’मध्ये तो एजंट म्हणून सहभागी होता. या प्रकारावर हरयाणा ‘एसआयटी’ची नजर होती व त्याला अटक करण्यात आली होती. मात्र सुटका झाल्यावर त्याने परत नवीन ‘रॅकेट’ सुरू केले. एआयपीएमटी परीक्षेत अत्याधुनिक ‘गॅजेट्स’चा वापर करून ‘कॉपी’ करण्याच्या प्रकाराने देशभरातील शिक्षण वर्तुळाला हादरा बसला होता.

टॅग्स :fraudधोकेबाजी