शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

प्रतिमा मलिन होताच आली जाग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 01:25 IST

एकेकाळी नागपूर शहर रस्ते, स्वच्छता व हिरवळीच्या बाबतीत देशभरातील ‘टॉप टेन’ शहरात होते. इंदूरचे शिष्टमंडळ नागपूरच्या अभ्यास दौऱ्यावर आले होते. नागपूर मॉडेलची देशभरात चर्चा होती. आज परिस्थिती बदलली आहे. नागपूर स्वच्छतेच्या बाबतीत ५५ व्या क्रमांकावर आहे तर गेल्या दोन वर्षात इंदूर ‘टॉप टेन’ शहरात अव्वल आहे. दुसरीकडे नागपूर मॉडेल माघारले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत माघारल्यानंतर महापालिकेतील सत्तापक्षाची झोप उघडली. इंदूर शहराने घेतलेल्या भरारीचा अभ्यास करण्यासाठी मंगळवारी स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ इंदूरच्या अभ्यास दौऱ्यासाठी पोहचले व बुधवारी दुपारी शिष्टमंडळ परतले.

ठळक मुद्देस्थायी समिती व आरोग्य समितीच्या सदस्यांचा इंदूर अभ्यास दौरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी नागपूर शहर रस्ते, स्वच्छता व हिरवळीच्या बाबतीत देशभरातील ‘टॉप टेन’ शहरात होते. इंदूरचे शिष्टमंडळ नागपूरच्या अभ्यास दौऱ्यावर आले होते. नागपूर मॉडेलची देशभरात चर्चा होती. आज परिस्थिती बदलली आहे. नागपूर स्वच्छतेच्या बाबतीत ५५ व्या क्रमांकावर आहे तर गेल्या दोन वर्षात इंदूर ‘टॉप टेन’ शहरात अव्वल आहे. दुसरीकडे नागपूर मॉडेल माघारले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत माघारल्यानंतर महापालिकेतील सत्तापक्षाची झोप उघडली. इंदूर शहराने घेतलेल्या भरारीचा अभ्यास करण्यासाठी मंगळवारी स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ इंदूरच्या अभ्यास दौऱ्यासाठी पोहचले व बुधवारी दुपारी शिष्टमंडळ परतले.अभ्यास दौऱ्यात आरोग्य सभापती मनोज चापले, अपर आयुक्त अजीज शेख, उपायुक्त नितीन कापडणीस, स्वास्थ्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे, सुवर्णा दखने, विभागीय अधिकारी दीनदयाल टेंभेकर, रामभाऊ तिडके यांच्यासह स्थायी समिती व आरोग्य समितीच्या सदस्यांचा समावेश होता.इंदूरमध्ये काय बघितले ?अभ्यास दौऱ्यात शिष्टमंडळातील सदस्यांनी स्वच्छतेबाबत माहिती घेतली. इंदूर शहरातील नागरिक स्वच्छतेबाबत कमालीचे जागरूक आहेत. शहरातील प्रत्येक घरातील कचरा विलग होऊनच बाहेर पडतो.शहराती संपूर्ण कचºयाचे संकलन आणि वाहतूक महापालिके मार्फत करण्यात येते. इंदूर महापालिकेत १९ झोन असून ८५ वॉर्ड आहेत. ६०० कचरा गाड्या कचरा संकलन करतात. ८५ वॉर्डमध्ये प्रत्येकी एक मोठे वाहन देण्यात आले आहे. शहरात कचरा संकलनासाठी १० ट्रान्सपोर्ट स्टेशन आहे. घराघरांतून संकलित केलेला कचरा या ट्रान्सपोर्ट स्टेशनवर छोट्या कचरागाड्यांद्वारे आणण्यात येतो. तेथून तो डम्पिंग यार्डला पाठविला जातो. डम्पिंग यार्डमध्ये संपूर्ण कचऱ्यांवर प्रक्रिया केली जाते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर