शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
3
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
4
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
5
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
6
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
7
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
8
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
9
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
10
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
11
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
12
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
13
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
14
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
15
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय
16
बाबो! ३ मुलांची आई सासऱ्यासोबत झाली फरार; पतीने जाहीर केलं २० हजारांचं बक्षीस
17
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
18
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
19
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?

चेहऱ्याच्या ‘स्कॅनिंग’नंतरच मिळणार प्रश्नपत्रिका

By admin | Updated: March 16, 2016 08:39 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना सुरुवात झाली आहे. परीक्षा प्रणालीत जास्तीत जास्त

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना सुरुवात झाली आहे. परीक्षा प्रणालीत जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या अग्रवाल समितीच्या शिफारशींनुसार यंदापासून प्रश्नपत्रिकांची ‘ई-डिलिव्हरी’ करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी शाखेच्या पेपरपासून ही सुरुवात करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सुरक्षित रहावी यासाठी परीक्षा केंद्रावरील जबाबदारी अधिकाऱ्याच्या चेहऱ्याचे संगणकाने ‘स्कॅनिंग’ केल्यानंतरच प्रश्नपत्रिका मिळू शकणार आहे.राज्यातील विद्यापीठांमधील शिक्षणाचा दर्जा वाढावा व जास्तीत जास्त प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर व्हावा याकरीता राज्य शासनाने राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीची स्थापना केली होती. या समितीने केलेल्या शिफारसींनुसार ‘आयटी रिफॉर्म्स’ साठी विद्यापीठाकडून प्रयत्न सुरू झाले. परीक्षा प्रणालीला ‘आॅनलाईन’ स्वरूप आले असून परीक्षा अर्ज भरणे, निकाल लावणे, मूल्यांकन इत्यादी गोष्टी ‘आॅनस्क्रीन’ व ‘आॅनलाईन’ करण्यात येत आहे. त्याहून समोर जात आता प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर ‘आॅनलाईन’ पद्धतीने पोहोचविण्यात येणार आहेत.परीक्षेच्या दोन तासांआधी महाविद्यालयाच्या त्यांच्या ‘लॉगिंन आयडी’वर प्रश्नपत्रिका मिळणार आहे. परीक्षा केंद्रावरील जबाबदार अधिकाऱ्याच्या ‘ई-मेल’वर ४८ तासांअगोदर परीक्षेबाबत माहिती देणारी माहिती पाठविण्यात येईल. प्रत्यक्षात ज्या दिवशी पेपर असेल तेव्हा सकाळी ७.३० वाजता ‘लॉगिन आयडी’ व ‘पासवर्ड’ देण्यात येतील. हा ‘पासवर्ड’ प्रत्येक वेळी वेगवेगळा असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधित अधिकाऱ्याच्या चेहऱ्याचे ‘स्कॅनिंग’ होऊनच ‘अकाऊंट’ उघडू शकेल. सकाळी ८.३० वाजता महाविद्यालयाला प्रश्नपत्रिका मिळेल.(प्रतिनिधी)आपात्कालीन आराखडादेखील तयारसंबंधित प्रणाली ही अतिशय सुरक्षित असून पेपर फुटण्याची कुठेही शक्यता नाही. समजा परीक्षा केंद्रावरील संबंधित अधिकारी काही आकस्मिक कारणांमुळे पेपरच्या दिवशी पोहोचू शकला नाही तर काय करायचे याबाबत विद्यापीठाकडून आपात्कालीन आराखडा तयार करण्यात आला आहे. कुठल्याही परिस्थितीत पेपर वेळेतच सुरू होतील. आपात्कालीन परिस्थितीमध्येदेखील परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचतील याची विद्यापीठ हमी देत आहे, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.