शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

मनपाच्या परवानगीनंतरच रस्त्यावर खोदकाम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 23:59 IST

मोबाईल कंपन्या, महावितरण के बल टाकण्यासाठी तर ओसीडब्ल्यू जलवाहिन्यासाठी शहरातील रस्त्यांवर खोदकाम करतात. परंतु काम झाल्यानंतर रस्त पूर्ववत केला जात नाही. यामुळे रस्ते नादुरुस्त होतात. महापालिकेवर आर्थिक बोजा पडतो. तसेच नागरिकांनाही त्रास होतो. याचा विचार करता यापुढे केबल वा जलवाहिन्यासाठी खोदकाम करताना महापालिकेची परवानगी घ्यावी लागेल. सोबतच अनामत रक्कम जमा करावी लागेल. त्याशिवाय संबंधित कंपन्यांना खोदकाम करता येणार नाही, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी बुधवारी दिले.

ठळक मुद्देआयुक्तांचे आदेश : अनामत रक्कमही ठेवावी लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोबाईल कंपन्या, महावितरण के बल टाकण्यासाठी तर ओसीडब्ल्यू जलवाहिन्यासाठी शहरातील रस्त्यांवर खोदकाम करतात. परंतु काम झाल्यानंतर रस्त पूर्ववत केला जात नाही. यामुळे रस्ते नादुरुस्त होतात. महापालिकेवर आर्थिक बोजा पडतो. तसेच नागरिकांनाही त्रास होतो. याचा विचार करता यापुढे केबल वा जलवाहिन्यासाठी खोदकाम करताना महापालिकेची परवानगी घ्यावी लागेल. सोबतच अनामत रक्कम जमा करावी लागेल. त्याशिवाय संबंधित कंपन्यांना खोदकाम करता येणार नाही, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी बुधवारी दिले.लोककर्म विभागातर्फे सुरू असलेल्या सिमेंट रस्ते आणि अन्य प्रकल्पांचा महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीतआढावा घेण्यात आाला. जोपर्यत कंपनी वा कंत्राटदार खोदकाम केलेला रस्ता पूर्ववत करत नाही आणि त्याला संबंधित अधिकाऱ्यांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यत ठेव म्हणून जमा असलेली रक्कम परत दिली जाणार नाही. यासंदर्भातील परिपत्रक तातडीने संबंधित विभाग, कंपनी आणि एजन्सीजना पाठविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.बैठकीत रस्ता खोदकाम झाल्यानंतर त्याचे पुनर्भरण करण्यात येत नाही. केले तर ते थातूरमातूर होत असल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. नियमात असताना आपण संबंधित विभाग, एजन्सींकडून ठेव म्हणून रक्कम जमा का करीत नाही, यावर नियमांची चाचपणी केल्यानंतर तातडीने हा निर्णय अमलात आणण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.शहरातील सिमेंट रस्त्यांच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. पहिल्या आणि दुसऱ्यां टप्प्यातील सिमेंट रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी महानगरपालिका अधिनियम २३५ आणि २३७ अन्वये कार्यवाही करीत ज्या रस्त्याचे बांधकाम सुरू करीत आहे त्या रस्त्यावरील वाहतूक अन्यत्र वळविण्यासंदर्भात आदेश काढावे आणि त्यासंदर्भातील माहिती वाहतूक पोलिसांना द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचा नीट निचरा होईल, अशी व्यवस्था करा आणि तातडीने कामे पूर्ण करा, सिमेंट रस्त्यांसोबतच शहरातील डी.पी. रोड, मोक्षधामनजिकचा पूल, हुडकेश्वर-नरसाळा पाणी टाकी, नवी शुक्रवारी क्रीडा संकुल, फिश मार्केट, नरसाळा दहन घाट, त्रिमूर्ती नगर अग्निशमन केंद्र, लक्ष्मीनगर झोन नागरी सुविधा केंद्र, शहरी बेघर निवारा आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावाही वीरेंद्र सिंह यांनी घेतला.यावेळी  अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता मनोज तालेवार, तांत्रिक सल्लागार विजय बनगीरवार, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, राजेश भूतकर, अनिरुद्ध चौगंजकर, मोती कुकरेजा, गिरीश वासनिक, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल, उपअभियंता राजेश दुफारे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार उपस्थित होते. 

प्रकल्पाच्या ठिकाणी माहिती फलक लावासिमेंट रस्ता अथवा शहरात कुठलाही प्रकल्प सुरू असेल तर त्याची संपूर्ण माहिती नागरिकांना होणे आवश्यक आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक सिमेंट रस्ता बांधकाम ठिकाणी कंत्राटदाराचे नाव, प्रकल्पाची किंमत, कार्य सुरू होण्याची तारीख, पूर्ण होण्याचा अवधी ही संपूर्ण माहिती तातडीने लावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. इतकेच नव्हे तर वळण रस्ता, रिफ्लेक्टर आदी लावण्याचेही निर्देश त्यांनी दिले. 

दुभाजकांवर लागणार रिफ्लेक्टरशहरातील प्रत्येक रस्ता दुभाजकांवर रिफ्लेक्टर आणि वाहतूक नियमांचे फलक लावण्याचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. हे रिफ्लेक्टर एका विशिष्ट अंतरावर लावण्यात यावे. संपूर्ण शहरात लावण्यात येणारे फलक एकाच उंचीची, एकाच डिझाईनची असावेत, अशाही सूचना त्यांनी केल्या. 

१०जुलैला  समन्वय बैठकजुलै महिन्यापासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी नागपूर महापालिका हद्दीत काम करणाऱ्या विविध विभागांची, एजन्सीची समन्वय बैठक आयोजित करण्यात येईल,यात मेट्रो रेल्वे, ओसीडब्ल्यू, वीज कंपनी, बीएसएनएल, पोलीस विभाग अशा सर्वच विभागांच्या विभागप्रमुखांना आमंत्रित करण्यात येणार आहे. शहर हद्दीत काम करताना प्रत्येक विभागाचा समन्वय असावा, हा या बैठकीमागील हेतू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.  पहिली बैठक १० जुलैला आयोजित करण्याचे निर्देश  वीरेंद्र सिंह यांनी दिले. 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर