शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतर काँग्रेस नेत्यांनी गांधींना चौकटीबाहेर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:32 IST

कॉंग्रेस पक्षाने भारताला स्वातंत्र्य नाही तर फाळणीच्या जखमा दिल्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनादेखील फाळणी अमान्य होती.

ठळक मुद्देइंद्रेश कुमार यांचा आरोप : अरविंद आगाशे काका स्मृती व्याख्यानमालेला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉंग्रेस पक्षाने भारताला स्वातंत्र्य नाही तर फाळणीच्या जखमा दिल्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनादेखील फाळणी अमान्य होती. त्यामुळेच त्यांनी कुठलाही आनंदोत्सव साजरा केला नव्हता किंवा तशी प्रतिक्रियादेखील दिली नव्हती. मात्र तत्कालीन कॉंग्रेस नेत्यांनी महात्मा गांधी यांना मुख्य प्रवाहातून बाहेर करत चौकटीबाहेर काढले, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांनी केला. प.पू.कृष्णदास काका माऊली समाधी सेवा मंडळ, खामगाव व कृष्णदास सेवा मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अरविंद आगाशे काका स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते.राणी लक्ष्मीबाई सभागृह, लक्ष्मीनगर येथे आयोजित या व्याख्यानमालेला डॉ. प्रकाश मालगावे यांचीदेखील उपस्थिती होती. ‘भारताच्या उत्थानात संतांचे कार्य’ या विषयावर इंद्रेश कुमार यांनी व्याख्यान दिले. भारताच्या इतिहासात मुगलांचे व ब्रिटिशांचे आक्रमण शिकविण्यात येते. मात्र त्यात गौरवशाली काहीच नाही. त्यामुळे असा इतिहास शिकविण्यात अर्थच नाही. अकबराला महान बादशहा म्हणण्यात येते. मात्र प्रत्यक्षात त्याला तसे म्हणणे म्हणजेच मोठे ढोंग आहे, असे प्रतिपादन इंद्रेश कुमार यांनी केले.आपल्या देशात विद्वान आणि उपदेशक यांचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे संतांचे प्रमाण घटते आहे. यामुळे अनेक समस्या वाढल्या आहेत. विद्वान उपदेश देतात आणि त्यांच्यामुळे विवाद निर्माण होतात तर संत आचरणातून समजवतात व ते समस्यांवर समाधान सांगतात. देशाला विद्वान व संत दोघांचीही आवश्यकता आहे. मात्र विद्वानांनी संत होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे इंद्रेश कुमार म्हणाले. आपल्या देशाला संतांची परंपरा लाभली आहे. भ्रष्टाचारमुक्त व्यवस्थेसाठी संतांनी ‘दुसºयांचे धन म्हणजे माती’ या ओळींत उपाय सांगितला आहे. समस्या व आव्हाने सर्वांसमोरच येतात. मात्र संतांच्या विचारांतूनच अडचणीच्या काळातदेखील आनंदाने जगण्याचे बळ मिळते, असे सांगताना इंद्रेश कुमार यांनी भगवा दहशतवादाच्या नावाखाली त्यांना फसविण्याचे कसे प्रयत्न झाले याचे उदाहरण दिले.अस्पृश्यता हे पापचआपल्या देशातील संतांनी समाजाला भक्तीमार्गासोबतच देशभक्तीचेदेखील संस्कार दिले. अहिंसा व बलिदानाची शक्ती समजावली. लोकवाणी व जनवाणीत संत बोलायचे. अस्पृश्यतेवरदेखील त्यांनी मौलिक भाष्य केले आहे. आजच्या तारखेत सामाजिक समरसतेची आवश्यकता असून अस्पृश्यता व भेदाभेद मानणे हे पापच असल्याचे मत इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले.तर पाकिस्तान जगात नसेल१४ आॅगस्ट १९४७ पूर्वी जगाच्या नकाशात पाकिस्तानचा नामोल्लेखदेखील नव्हता. मात्र पाकिस्तानच्या हरकती अशाच सुरू राहिल्या, तर भविष्यात पाकिस्तान नकाशावरुन पुसल्या जाईल. चीनदेखील भारतावर वर्चस्व गाजवू पाहत आहे. मात्र चीन व पाकिस्तान यांचे जगात कुणीच मित्र नाहीत व भारताचे सर्वाधिक देश मित्र आहेत. चीनच्या आर्थिक आक्रमणाला स्वदेशीनेच प्रत्युत्तर देता येईल, असे इंद्रेश कुमार म्हणाले.