शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व नंतर मुख्यमंत्र्यांचे पश्चिम विदर्भावर लक्ष; ‘रामगिरी’वर राजकीय हालचाली वाढल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 10:04 IST

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीला अजून वर्ष-दीड वर्षांचा कालावधी असला तरी, विदर्भाचा गड कायम राखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे सक्रिय झाले आहेत.

ठळक मुद्देपश्चिम विदर्भातील आमदार व नगराध्यक्षांची घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीला अजून वर्ष-दीड वर्षांचा कालावधी असला तरी, विदर्भाचा गड कायम राखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे सक्रिय झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी शनिवारी नागपुरातील ‘रामगिरी’ येथे पूर्व विदर्भातील आमदार व नगर परिषदेच्या अध्यक्षांची बैठक घेतल्यानंतर, रविवारी पश्चिम विदर्भाची बैठक घेतली. या बैठकीतही मुख्यमंत्र्यांनी नगर परिषदेच्या विकासा कामांचा आढावा घेत आपल्या लोकप्रतिनिधींना सतर्क केले. जनतेच्या संपर्कात राहून कामे करा, असा सल्ला द्यायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरीवर बैठकांचा सपाटा लावला आहे. या बैठका विकास कामांना गती देण्यासाठी असल्याचे सांगितले जात असले तरी, विदर्भात आपला राजकीय पाया अधिक भक्कम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विदर्भाने भरभरून भाजपाला साथ दिली. ही साथ अशीच कायम राहावी, असा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात भंडारा-गोंदिया या दोन जिल्ह्यांची विशेष बैठक रामगिरीवर घेऊन नाना पटोलेंची उणीव भासू दिली जाणार नाही, असे संकेत दिले.यानंतर शनिवारी पूर्व विदर्भातील व रविवारी रात्री पश्चिम विदर्भातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली.पश्चिम विदर्भातील बैठकीला नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह आ. सुनील देशमुख, अनिल बोंडे, हरीश पिंपळे, अशोक उईके, आकाश फुंडकर, राजेंद्र पाटणी, प्रकाश भारसाकडे, चैनसुख संचेती, राजू तोडसाम यांच्यासह जवळपास सर्वच आमदार व नगर परिषदांचे अध्यक्ष उपस्थित होते.दोन तास चाललेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आमदार व नगर परिषदेच्या अध्यक्षांकडून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. बैठकीत मुख्यमंत्री नगराध्यक्षांना उद्देशून म्हणाले, जनतेने मोठ्या प्रमाणात भाजपाचे नगराध्यक्ष निवडून दिले आहेत.त्यामुळे आता प्रत्येक नगर परिषदेत स्वच्छता, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन ही आपली जबाबदारी आहे. जनतेच्या अपेक्षांवर आपल्याला खरे उतरावे लागले. गरज वाटेल तेथे मला मदत मागा, पण पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभार करा, आपले शहर सुंदर बनवा, असे आवाहन त्यांनी केले.

पैसे खर्च न करणाऱ्या नगर परिषदांवर नाराजीबैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासनाने पैसे देऊनही ते खर्च करू न शकलेल्या नगर परिषदांवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, एकीकडे पैसे मिळत नाही म्हणून ओरड होते तर दुसरीकडे काही नगर परिषदांनी दिलेला निधीही खर्च केला नाही. हे पैसे मार्चपूर्वी खर्च झाले नाही तर शासनाकडे परत येतील व पुन्हा या मुद्यावरून शासनाच्या नावाने ओरड सुरू होईल. त्यामुळे उपलब्ध असलेला निधी त्वरित खर्च करा, असे निर्देशही त्यांनी दिले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस