शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

जीव गेल्यानंतरच प्रशासनाला का येते जाग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 13:52 IST

इंद्रप्रस्थनगरातील साधना शशिकांत पुराडभट यांचा रविवारी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण होते ते किरकोळ अपघात. परंतु या अपघातामागचे खरे कारण होते ते प्रशासनाचा निष्काळजीपणा. त्यांचा जीव गेला आणि प्रशासनाने लगेचच त्या रस्त्याची डागडुजी केली. याचा अर्थ प्रशासनाला जीव गेल्यानंतरच जाग येते का, असा प्रश्न नागपूरकरांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देरस्त्यावरील उंचवट्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे प्रकरण : मुख्यमंत्र्यांना तक्रार केल्यानंतर मनपाने केली रस्त्याची दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंद्रप्रस्थनगरातील साधना शशिकांत पुराडभट यांचा रविवारी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण होते ते किरकोळ अपघात. परंतु या अपघातामागचे खरे कारण होते ते प्रशासनाचा निष्काळजीपणा. त्यांचा जीव गेला आणि प्रशासनाने लगेचच त्या रस्त्याची डागडुजी केली. याचा अर्थ प्रशासनाला जीव गेल्यानंतरच जाग येते का, असा प्रश्न नागपूरकरांनी उपस्थित केला आहे.घरातील चालतीफिरती आणि करती व्यक्ती अशी अचानक निघून गेल्याने त्या कुटुंबावर दु:खाचे सावट पसरले आहे. माझ्या आईच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल त्यांच्या मुलीने प्रशासनाला केला आहे.आकाशवाणी चौक ते जीपीओ चौकादरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी काही झाडे कापण्यात आली होती. रस्ता समतोल न करता, झाडाचे बुंधे तसेच ठेवण्यात आले होते.त्यामुळे झाडाचा कापलेला भाग उंचवट्यासारखा झाला होता. या रस्त्यावर जवळपास तीन ठिकाणी हा प्रकार दिसून आला. ४ मार्चला इंद्रप्रस्थनगर येथील रहिवासी साधना पुराडभड या आपल्या पतीसोबत रात्री ९ वाजताच्या सुमारास दुचाकीने आकाशवाणी चौकाकडून येत होत्या. त्यांची गाडी या उंचवट्यावरून गेली. गाडीचा बॅलेंस बिघडल्याने दोघेही पडले. यात साधना यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्यांना लागलीच शुअरटेक हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. आठवडाभर त्यांच्यावर उपचार करण्यात आला. परंतु त्या प्रतिसाद देऊ शकल्या नाही आणि रविवार, ११ मार्चला सकाळी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यांची मुलगी मधुरा पुराडभट यांनी आईच्या मृत्यूला कारण ठरलेल्या त्या रस्त्याचे फोटो घेतले. हे सर्व फोटो इन्स्टाग्रामवरून मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पोस्ट केले. त्यांना आईसोबत झालेल्या घटनेची माहिती दिली. त्याच्या दोन दिवसानंतर त्यांनी मनपाचे आयुक्त अश्विन मुदगल यांची भेट घेऊन, हा प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मला ते फोटो पाठविले आहे असे सांगून रस्त्याचे काम लवकरच होईल, असे आश्वासन मुदगल यांनी दिले. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर आज तो उंचवटा समतोल करण्यात आला. पण पूर्वीच मनपा प्रशासनाने याची दखल घेतली असती, तर आज साधना यांचा जीव गेला नसता, पुराडभट कुटुंबावर दु:खाचे सावट कोसळले नसते.यामागे दोष कुणाचा ?दोन वर्षांपासून हा उंचवटा रस्त्यावर आहे. मनपाच्या मुख्यालयाजवळून अगदी १०० मीटरच्या आत, जिल्हा सत्र न्यायालयाच्या अगदी समोर हे अपघातप्रवण स्थळ होते. मनपाच्या अधिकाऱ्यांना ते कधीच दिसले नाही. त्याचबरोबर याच ठिकाणी अनेकांसोबत अशा घटना घडल्या. परंतु त्यांनी कधी तक्रार केली नाही. खुद्द मनपा आयुक्तांनी आजपर्यंत तक्रारच आली नसल्याचे सांगितले. याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर, मनपाने त्याची दखल घेतली. रस्ता आज समतोल केला. पण त्याचा फायदा काय? आमच्या घरचा तर जीव गेला. किमान यात दोषी कोण? याचा शोध प्रशासनाने घ्यावा.- मधुरा पुराडभट, मृत साधना यांची मुलगी

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर