शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाच्या हत्येनंतर जरीपटक्यात तणाव

By admin | Updated: October 18, 2014 03:12 IST

एका तरुणाच्या हत्येनंतर जरीपटक्यात प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने आरोपीच्या घरावर हल्ला करून तोडफोड आणि जाळपोळ केली.

नागपूर : एका तरुणाच्या हत्येनंतर जरीपटक्यात प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने आरोपीच्या घरावर हल्ला करून तोडफोड आणि जाळपोळ केली. पोलिसांवर आणि त्यांच्या वाहनावरही दगडफेक केली. जमाव आक्रमक झाल्याचे पाहून पोलिसांनीही जोरदार लाठीमार केला. या घटनेमुळे जरीपटक्यात गुरुवारी रात्रीपासून प्रचंड तणाव आहे.पुरुषोत्तम मनोहरलाल बत्रा (वय ३२) असे मृताचे नाव आहे. परश्या बुकी म्हणून तो ओळखला जायचा. जरीपटक्यातील हरदास धरमशाळेजवळ परश्या राहात होता. किशोर नामक एका मित्रासोबत गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास जरीपटक्यातील दयानंद पार्कजवळ परश्या फिरत होता. आरोपी आरिफ ऊर्फ लॉझर्स विनोद इमॅन्युअल आणि त्याच्या चार ते पाच साथीदारांनी परश्यावर हल्ला चढवला. प्रारंभी शस्त्राने मारल्यानंतर आरोपींनी त्याच्या डोक्यात दगड घातला. या थरारक घटनेच्या वेळी आजूबाजूला मोठ्या संख्येत मंडळी होती. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे आरोपी पळून गेले. एकाने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. बराच वेळपर्यंत परश्या घटनास्थळी तडफडत होता. पोलीस आणि परश्याच्या मित्रांनी नंतर त्याला धंतोलीतील एका खासगी रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.हत्येनंतर प्रचंड तणाव नागपूर :परश्याच्या हत्येचे वृत्त पसरताच जरीपटक्यात प्रचंड तणाव निर्माण झाला. २०० वर लोकांच्या जमावाने आरोपी आरिफच्या मिसाळ लेआऊटमधील घराकडे धाव घेतली. त्याच्या घरासमोरची दुचाकी जाळली. कंपाऊंडचीही तोडफोड केली. काही जणांनी परश्याच्या घराच्या खिडक्यातून आतमध्ये जळते बोळे फेकून त्याचे घर पेटविण्याचा प्रयत्न केला. माहिती कळताच मोठा पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचे प्रयत्न केले. मात्र, जमावाने पोलिसांवरच तुफान दगडफेक सुरू केली. यामुळे काही पोलिसांना मार बसला. पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळे जमाव तेथून वसंतशहा चौकाकडे पळाला.चौघांना अटक, बाल्याचीही चौकशीपरशाची हत्या केल्याच्या आरोपाखाली जरीपटका पोलिसांनी आज सायंकाळी चौघांना अटक केली. आरिफ ऊर्फ लॉझर्स इमॅन्युअल (वय ३६), सुशांत ऊर्फ मोनू रवींद्र गजभिये (वय २५, रा. दोघेही मिसाळ लेआऊट), अमित ऊर्फ जय बल्लू शंभरकर आणि नेहाल ऊर्फ सनी रवी शेलारे (वय २१, रा. दोघेही हुडको कॉलनी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हत्येनंतर आरोपी आरिफ ‘बाल्या‘च्या संपर्कात होता,अशी चर्चा आहे. त्यामुळे पोलीस बाल्याचीही चौकशी करीत आहेत. तसेच परशाला फिरायला घेऊन जाणाऱ्या किशोरचीही भूमिका संशयास्पद वाटल्यामुळे पोलीस त्याचीही चौकशी करीत आहे. विशेष म्हणजे, जमावाने किशोरच्या झेंडा चौकातील घराकडे धाव घेतली होती. तो आढळला नाही, त्यामुळे जमावाच्या रोषातून तो सुटला, असे आता बोलले जाते. हत्येचे कारण गुलदस्त्यात परश्याची हत्या कोणत्या कारणामुळे झाली ते अद्याप स्पष्ट झाले नाही. आरोपी आरिफ कुख्यात गुन्हेगार असून, त्याचा अनेक गुन्हेगारांसोबत आणि काही राजकीय व्यक्तींसोबतही संबंध आहे. तो अवैध धंद्यांसोबतच खंडणी वसुलीतही सक्रिय आहे. परश्या क्रिकेट सट्ट्याची खायवाडी आणि कटिंग करायचा. यातून कमावलेले हजारो रुपये सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात द्यायचा. त्यामुळे त्याच्यासोबत युवकांची मोठी फौज जुळली होती. काही दिवसांपूर्वी परश्याने एका सामाजिक संघटनेचीही स्थापना केली होती. निवडणुकीच्या प्रचारात या संघटनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात त्याने चांगले काम केले होते. बुकींकडून वसुली करणाऱ्या आरिफ आणि त्याच्या साथीदारांना परश्याने अलीकडे हप्ता देण्यास नकार दिला होता. त्यामुळे आरिफसोबत त्यांचा वाद होता. आणखी काही बुकींना हप्ते देण्यापासून तो परावृत्त करीत होता. त्यामुळेच त्याची हत्या करण्यात आल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. क्रिकेट मॅचमध्ये लगवाडी करणाऱ्यांकडे त्याचे लाखो रुपये होते. त्यामुळे त्याचा काही जणांशी वाद सुरू होता. त्या वादातून परश्याची हत्या करण्यात आल्याचीही चर्चा आहे. चिमुकल्याचे हरवले पितृछत्रपरश्याच्या निकटस्थ सूत्रांनुसार, त्याचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला तीन महिन्यापूर्वीच बाळ झाले. मात्र, जन्मताच बाळाची प्रकृती खराब झाल्याने तीन महिन्यांपासून ते रुग्णालयातच होते, असे समजते. तीन दिवसांपूर्वीच बाळाला घरी आणण्यात आले. आरिफ आणि त्याच्या साथीदारांनी त्याची निर्घृण हत्या करून, पित्याचे छत्र हिरावून घेतले.पोलिसांचा लाठीमार दरम्यान, माहिती कळताच पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार घटनास्थळी पोहचले. जमावाने पोलिसांच्या एमएच ३१/ एजी ९६६८ क्रमांकाच्या मोबाईल व्हॅनवर जोरदार दगडफेक केली. पोलिसांनाही दगड लागले. परिस्थिती चिघळल्याचे पाहून पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. त्यात मोहनलाल बत्रा, हरिश रुधवानी, ठाकूर पेठवानी, नरेश साधवानी, सतीश आनंदानी यांच्यासह १० ते १२ जण जखमी झाले. पहाटे ३ वाजेपर्यंत दगडफेक, लाठीमार आणि घोषणाबाजीचा प्रकार सुरू होता. त्यानंतर आज सकाळपासून पुन्हा दयानंद पार्क, वसंतशहा चौक भागात तणाव निर्माण झाला. जमावाने आरोपींना अटक करण्याची मागणी लावून धरली. शिवाय लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधातही घोषणाबाजी सुरू झाली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या दीपक पांडे यांनी जमावाची समजूत काढून आरोपींना तातडीने अटक करण्याचे जरीपटका पोलिसांना आदेश दिले.