शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

तब्बल १६ महिन्यांनंतर मुख्य सूत्रधाराला अटक

By admin | Updated: May 20, 2014 01:10 IST

कुही तालुक्यातील नवरगाव फाट्याजवळील धानोली, चितापूर शिवारात सहा ठिकाणी दरोडा व सामूहिक अत्याचाराच्या घटनेतील सूत्रधाराला आठवडाभरापूर्वी मध्य प्रदेशात

कुही सामूहिक अत्याचार, दरोडा प्रकरण : २२ मेपर्यंत पोलीस कोठडी

गणेश खवसे - नागपूर

कुही तालुक्यातील नवरगाव फाट्याजवळील धानोली, चितापूर शिवारात सहा ठिकाणी दरोडा व सामूहिक अत्याचाराच्या घटनेतील सूत्रधाराला आठवडाभरापूर्वी मध्य प्रदेशात अटक करण्यात आली. त्याला सोमवारी नागपूर ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता २२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तब्बल १६ महिन्यानंतर मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली, हे विशेष! मन सुन्न करणारी ही घटना १८ जानेवारी २०१३ रोजी घडली होती. सामूहिक अत्याचार आणि दरोड्याप्रकरणी चच्चाय ऊर्फ चच्चू जोहरसिंग भोसले (२२), आतिश ऊर्फ टेनटेन ऊर्फ आरतीसिंग भोसले (२६) रा. चांपा, दिनेश राज ऊर्फ लखन चव्हाण (२२) व गुलाबचंद ऊर्फ निन्निकी बागचंद भोसले (२३) रा. झिरी ता. टेंभर्णे जि. हरदा (मध्य प्रदेश) यांना घटनेच्या काही दिवसांनंतर अटक केली होती. त्यानंतर मुख्य आरोपी रवी पवार याची बहीण संगीता गुलाब पवार (३०) रा. हरदा हिला अटक केली. सध्या हे पाचही आरोपी मध्यवर्ती कारागृहात आहेत. या आरोपींविरुद्ध भादंविच्या ३९५, ३९७, ३७६, ३४२, ४२७, ७०४, ५०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेपासून मुख्य आरोपी आणि या घटनेचा सूत्रधार रवी पवार हा फरार झाला होता. त्याला अटक करण्यासाठी उस्मानाबाद, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीडसह मध्य प्रदेशातील हरदा, बºहाणपूर, खंडवा, भोपाळ आदी ठिकाणी पोलिसांचे वेगवेगळे पथक पाठविण्यात आले होते. ‘खबरे’सुद्धा या कामी लावले. परंतु, आरोपी कोणत्या पारधी बेड्यावरून घटनास्थळ बदलवित असल्याने मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांच्या नाकीनऊ आले. नागपूर ग्रामीण पोलीस मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात बर्‍याचदा जाऊन आले. मात्र, थोड्या अंतरावरून तो पोलिसांना चकमा द्यायचा. कुहीतील सामूहिक अत्याचार आणि दरोडा प्रकरणानंतर मध्य प्रदेशातील रेहटगाव (जि. हरदा, मध्य प्रदेश) येथे तो लपला होता. तेथेही त्याने उपद्व्याप सुरूच ठेवला. मध्य प्रदेशाला लागून असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात त्याने एकाचा खून केल्याने उस्मानाबाद पोलीसही त्याच्या मागावर होते. दरम्यान, रेहटगाव येथे चोरी, घातपात, लुटमार, मारहाण, फसवणूक यासह अनेक गंभीर गुन्हे त्याने या कालावधीत केले. तसेच एका घटनेत त्याने चक्क मध्य प्रदेश पोलिसांवर गोळीबार केला. तेव्हापासून मध्य प्रदेश पोलीस हात धुवून त्याच्या मागे लागले होते. अखेर त्याला सापळा रचून आठवडाभरापूर्वी अटक केली. तो सामूहिक अत्याचार आणि दरोडा तसेच इतर गंभीर गुन्ह्यातील आरोपी असल्याने त्याला नागपूर ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता २२ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी) सतत पाठपुरावा या घटनेनंतर जनसामान्यांमध्ये दरोडेखोर, आरोपींबद्दल संताप दिसून आला. दुसर्‍या घटनास्थळाला भेट दिली असता अनेकांनी ही चीड व्यक्त केली. परंतु, पाच दिवसानंतरही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नव्हते. केवळ आरोपी ताब्यात आहे, असे सांगितले जात होते. परंतु, हा तपास भरकटत असल्याचे दिसताच त्याबाबत ‘लोकमत’मध्ये सडेतोड वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर महिना, सहा महिने, वर्ष उलटल्यानंतरही मुख्य आरोपी रवी पवार याला पकडण्यात पोलीस अपयशी कसे ठरले, हे वास्तव मांडण्यात आले. वारंवार वृत्त प्रकाशित होत असल्याने या प्रकरणापासून पोलिसांना अलिप्त राहू देण्यात आले नाही. परिणामी नागपूर ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आरोपीच्या मागावरच होते. अशात आरोपीला पकडण्यात आले.