शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

१५ महिन्यानंतर ‘सौदी’तून परतली नागपुरातील रुख्साना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 10:49 IST

नोकरीचे आमिष दाखवून दोन लाख रुपयात सौदी अरेबिया येथे विकण्यात आलेली महिला १५ महिन्यानंतर आपल्या घरी परतली. सक्करदरा पोलिसांनी सोमवारी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडित महिलेला तिच्या कुटुंबीयांकडे सोपविले.

ठळक मुद्देदोन लाख रुपयात विकले होते कामाऐवजी मिळाली गुलामी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोकरीचे आमिष दाखवून दोन लाख रुपयात सौदी अरेबिया येथे विकण्यात आलेली महिला १५ महिन्यानंतर आपल्या घरी परतली. सक्करदरा पोलिसांनी सोमवारी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडित महिलेला तिच्या कुटुंबीयांकडे सोपविले. रुख्साना बेगम सलमान खान (३२) असे पीडित महिलेचे नाव असून ती ताजाबाद येथील रहिवासी आहे.रुख्साना यांना शमा बेगम आणि हाजी साहब नावाच्या व्यक्तीने खाडी देशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांनी सईन आणि मुंबईतील मुस्तफा नावाच्या साथीदाराच्या मदतीने तिला आपल्या जाळ्यात अडकविले. सप्टेंबर २०१६ मध्ये तिला मुंबईला पाठवले. तिथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर दुबईला पाठवण्यात आले. दुबईवरून तिला सौदी अरबला पाठवण्यात आले. तिथे एका शेखच्या घरी ती मोलकरणीसारखी राहू लागली. रुख्साना यांच्यानुसार सुरुवातीला शेख कुटुंबाने तिच्यासोबत सामान्य व्यवहार केला. परंतु काही दिवसातच त्यांचा व्यवहार बदलला. ते तिला त्रास देऊ लागले. तिला पोटभर जेवण दिले जात नव्हते. सातत्याने काम करायला लावायचे. मारहाण करायचे. एखाद्या गुलामासारखी वागणूक दिली जात होती. रुख्साना हिने जेव्हा भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तिला दोन लाख रुपयात खरेदी केल्याचे सांगण्यात आले. दोन लाख रुपये परत केल्यावरच ती भारतात जाऊ शकेल, असेही सांगितले. रुख्सानाने आपल्या बहिणीला आपबिती सांगितली. तिची बहीण कनिजाने ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे, सविता पांडे आणि सुनिता ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्या मदतीने सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. जून २०१७ मध्ये पोलिसांनी मानव तस्करीचा गुन्हा दाखल करून शमा बेगम आणि हाजी साहब याला अटक केली.गुन्हा दाखल केल्यानंतरही रुख्सानाला घरी परत येता आले नाही. सौदी अरब येथील प्रकरण असल्याने पोलिसांनी विदेश मंत्रालयाशी संपर्क साधला. विदेश मंत्रालयाकडून घरी परत आणण्यास उशीर झाला. भारतात परत येण्यासाठी रुख्सानाला विमानाच्या भाड्यासाठी मोठ्या रकमेची गरज होती. इतक्या रकमेची व्यवस्था करणे त्यांच्यासाठी शक्य नव्हते. पोलिसांनी शेख कुटुंबावर दबाब टाकला. मानव तस्करीच्या प्रकरणात कारवाई होण्याच्या भीतीने शेख कुटुंब रुख्सानाला नागपूरला परत पाठवण्याची व्यवस्था करण्यास तयार झाले. रुख्सानाला वेतनाच्या रूपात मिळणाऱ्या रकमेतून तिला मुंबईला पाठवले. मुंबईवरून ती नागपूरला परत आली. सक्करदरा पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी पीएसआय डी. एम. राठोड यांनी तिचे बयान नोंदवून घेतले. यानंतर तिला तिच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले.मुलांच्या भविष्यासाठी केले काम१५ महिन्यानंतर आपल्या मुलांना व कुटुंबीयांना पाहून रुख्सानाचे डोळे भरून आले. तिचा पती मजुरी करतो, तीन मुलं आहेत. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी ती खाडी देशात जाऊन काम करण्यास तयार झाली होती. तिला शेख परिवार अतिशय श्रीमंत असल्याचे माहीत होते. परंतु तिथे तिला दोनवेळचे जेवणही मिळेनासे झाले होते.

टॅग्स :Crimeगुन्हा