शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

१० दिवसानंतरही गणवेश नाही

By admin | Updated: July 8, 2017 02:03 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत महापालिकेच्या वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यासाठी शासनाने यंदा रोख अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

 मनपा प्रशासन करतेय विद्यार्थी-पालकांची थट्टा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत महापालिकेच्या वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यासाठी शासनाने यंदा रोख अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी विद्यार्थी व त्याच्या आईचे संयुक्त खाते बँकेत काढण्यास सांगितले. परंतु या योजनेसाठी शासनाने आखलेले नियम व अटी इतक्या जाचक आहेत की अनेक पालकांना आपल्या मुलांना गणवेशाशिवाय शाळेत पाठवावे लागत आहे. लोकमतने या विषयावर शनिवारी विविध शाळांना भेटी देऊन पालकांशी चर्चा केली असता पालकांनी लोकमतजवळ तक्रारींचा पाढाच वाचला. शाळा सुरु होऊन १० दिवस झाले तरी गणवेशाच्या नावावर पालकांची थट्टा सुरू असून शासनाला जर खरच आमच्या मुलांना गणवेश द्यायचा असेल तर आधी या जाचक अटी रद्द कराव्यात, अशी मागणी या पालकांनी केली. ही आहे खरी अडचण शासनातर्फे विविध विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी ५ डिसेंबर २०१६ ला जीआर काढला. यात थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) ही योजना कार्यान्वित करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशाचे अनुदान सुद्धा समाविष्ट करण्यात आले. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांना आईसोबत बँकेमध्ये संयुक्त खाते उघडायचे आहे. बँकेत खाते उघडल्यानंतर पालकांना गणवेश खरेदी करायचा आहे. खरेदी केलेल्या गणवेशाची पावती मुख्याध्यापकांना दिल्यानंतर, विद्यार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार आहे. विद्यार्थ्यांचे खाते झिरो बॅलेंसवर उघडण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना पत्र सुद्धा दिले आहे. परंतु बँकांकडून खाते उघडण्यासाठी पैशांची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे महापालिकेच्या शाळांमध्ये बहुतांश विद्यार्थी कामगार, मजूरांचे पाल्य आहे. अनेकांकडे बँकेत खाते उघडण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र सुद्धा नाहीत. खाते उघडण्यासाठी ५०० ते १००० रुपयांचा खर्च येतो आहे. शिवाय दिवसभराची मजुरी सुद्धा त्यात जात आहे. त्यामुळे पालकांनी योजनेकडे पाठ फिरविली आहे. पालक जोपर्यंत बँकेत खाते उघडणार नाही. गणवेश खरेदी करून, त्याची पावती मुख्याध्यापकाला देणार नाही. तोपर्यंत गणवेशाचे अनुदान विद्यार्थ्याच्या खात्यात जमा होणार नाही.