शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांवरील प्रतिज्ञापत्र अपूर्णच; सुधारित प्रतिज्ञापत्रासाठी जानेवारीपर्यंत मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 07:09 IST

विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने जनहित याचिका दाखल केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांवर मुख्य सचिवांनी १० ऑगस्ट २०२३ रोजी सादर केलेले प्रतिज्ञापत्र अपूर्णच आहे, हे राज्य सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष मान्य केले. तसेच, सुधारित प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी २९ जानेवारीपर्यंत वेळ मागितला. न्यायालयाने सरकारची ही विनंती मंजूर करून प्रकरणावर ३१ जानेवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.

विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने जनहित याचिका दाखल केली आहे. २०१४ मध्ये राज्य सरकारने विदर्भातील सिंचन प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याची ग्वाही न्यायालयाला दिली होती; परंतु ती ग्वाही पाळण्यात आली नाही. विदर्भातील सिंचन प्रकल्पांकडे आजही अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे, असे समितीचे म्हणणे आहे. विदर्भातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाचा प्रश्न राज्य सरकारच्या विविध विभागांशी संबंधित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी त्या सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यक आहे. १८ जुलै २०२३ रोजी न्यायालयाने ही बाब लक्षात घेता राज्याच्या मुख्य सचिवांना यावर १८ ऑगस्ट २०२३ पर्यंत सर्वसमावेशक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर मुख्य सचिवांनी संबंधित प्रतिज्ञापत्र सादर केले होते. 

न्यायालयाने बुधवारी त्या प्रतिज्ञापत्रातील सर्व माहिती उथळ व मोघम स्वरूपाची आहे, असे ताशेरे ओढून सरकारला स्पष्टीकरण मागितले होते. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. अविनाश काळे तर, सरकारतर्फे ॲड. दीपक ठाकरे यांनी कामकाज पाहिले.