शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

कोट्यवधी रुपयाच्या मुरुम चोरी प्रकरणात अ‍ॅफकॉनच्या अनिलकुमार यांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 20:29 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अ‍ॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अनिलकुमार बच्चू सिंग यांना कोट्यवधी रुपयाच्या मुरुम चोरी प्रकरणात तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अ‍ॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अनिलकुमार बच्चू सिंग (५०) यांना कोट्यवधी रुपयाच्या मुरुम चोरी प्रकरणात तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. तसेच, वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलिसांना नोटीस बजावून यावर एक आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले. त्यामुळे अनिलकुमार यांना जोरदार दणका बसला.अनिलकुमार यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अनिलकुमार यांनी खूप जोर लावला, पण त्यांना यात यश मिळाले नाही. त्यांनी सुरुवातीला वर्धा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायालयाने गेल्या १३ सप्टेंबर रोजी विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.२२ ऑगस्ट २०१९ रोजी सेलू पोलिसांनी कोझी प्रॉपर्टीज कंपनीचे अधिकृत स्वाक्षरीकर्ते नीलेश सिंग यांच्या तक्रारीवरून अनिलकुमार आणि एम. पी. कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक आशिष दफ्तरी यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १२०-ब (कट रचणे), ३७९ (चोरी), ४२७ (आर्थिक नुकसानकारक कृती), ४४७ ( अवैध प्रवेश), ३४ (समान उद्देश) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. तक्रारीतील माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील केळझर, गणेशपूर व जवळपासच्या परिसरात कोझी प्रॉपर्टीज कंपनीची १००० एकर शेतजमीन आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने त्या जमिनीचा दर्शनी भाग चार पदरी महामार्गासाठी संपादित केला आहे. तसेच, राज्य सरकारनेही नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाकरिता काही जमीन संपादित केली आहे. दरम्यान, अ‍ॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर आणि एम. पी. कन्स्ट्रक्शन या कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून कोझी प्रॉपर्टीज कंपनीच्या मौजा केळझर येथील खसरा क्र. ६१२/१, ६१२/२, ६१३/१ व ६१३/२ या जमिनीतील कोट्यवधी रुपयाचा मुरुम चोरी केला. मुरुम काढण्यासाठी १०० एकरवर क्षेत्रफळात ४ ते १५ फूट खोलपर्यंत खोदकाम करण्यात आले. परिणामी, जमिनीचेही कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. यामध्ये अ‍ॅफकॉन कंपनीच्या संचालक मंडळाचा सहभाग असण्याचा संशयदेखील व्यक्त करण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अ‍ॅफकॉन कंपनीला वर्धा जिल्ह्यातील खडकी आमगाव ते पिंपळगावपर्यंतच्या रोडचे कंत्राट दिले आहे. तसेच, या कंपनीने मुरुम भरून जमीन समांतर करण्याकरिता एम. पी. कन्स्ट्रक्शनला उप-कंत्राट दिले आहे. या कामाकरिता कोझी प्रॉपर्टीज कंपनीच्या जमिनीतील मुरुम चोरण्यात आला आहे. न्यायालयात अनिलकुमार यांच्यातर्फे वरिष्ठ वकील अनिल मार्डीकर यांनी कामकाज पाहिले.कोझी प्रॉपर्टीजचा अर्ज मंजूरअनिलकुमार यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात सरकार पक्षाला साहाय्य करण्यासाठी कोझी प्रॉपर्टीज कंपनीने अधिकृत स्वाक्षरीकर्ते नीलेश सिंग यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला. कोझी प्रॉपर्टीज कंपनीला वर्धा सत्र न्यायालयातही सरकार पक्षाला साहाय्य करण्याची अनुमती देण्यात आली होती. कोझी प्रॉपर्टीजतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अ‍ॅफकॉन कंपनीला वर्धा जिल्ह्यातील खडकी आमगाव ते पिंपळगावपर्यंतच्या रोडचे कंत्राट दिले आहे. तसेच, या कंपनीने मुरुम भरून जमीन समांतर करण्याकरिता एम. पी. कन्स्ट्रक्शनला उप-कंत्राट दिले आहे. या कामाकरिता कोझी प्रॉपर्टीज कंपनीच्या जमिनीतील मुरुम चोरण्यात आला आहे. न्यायालयात अनिलकुमार यांच्यातर्फे वरिष्ठ वकील अनिल मार्डीकर यांनी कामकाज पाहिले.कोझी प्रॉपर्टीजचा अर्ज मंजूरअनिलकुमार यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात सरकार पक्षाला साहाय्य करण्यासाठी कोझी प्रॉपर्टीज कंपनीने अधिकृत स्वाक्षरीकर्ते नीलेश सिंग यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला. कोझी प्रॉपर्टीज कंपनीला वर्धा सत्र न्यायालयातही सरकार पक्षाला साहाय्य करण्याची अनुमती देण्यात आली होती. कोझी प्रॉपर्टीजतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयtheftचोरी