शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

वकिलांनी पारदर्शकपणे बाजू मांडावी

By admin | Updated: February 6, 2015 00:59 IST

वकिली व्यवसायात नव्याने आलेल्या तरुणांनी सखोल अभ्यास आणि पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. आपली बाजू मांडताना कुठल्याही विशिष्ट पद्धतीचा उपयोग न करता सोप्या

सुनील मनोहर: विधी महाविद्यालयाच्या ‘जस्टा कॉजा’चे उद्घाटननागपूर : वकिली व्यवसायात नव्याने आलेल्या तरुणांनी सखोल अभ्यास आणि पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. आपली बाजू मांडताना कुठल्याही विशिष्ट पद्धतीचा उपयोग न करता सोप्या पद्धतीने बाजू मांडावी. महत्त्वाचे म्हणजे बाजू मांडताना त्यात पारदर्शकता असावी, असे मत राज्याचे महाधिवक्ता सुनील मनोहर यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘जस्टा कॉजा’ या विधी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. गुरुवारी सायंकाळी महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यक्रमाच्या नागपूर विद्यापीठाच्या ‘बीसीयूडी’ संचालक डॉ. श्रीकांत कोमावार उपस्थित होते. तर पदव्युत्तर विधी विभागाचे प्रमुख डॉ. शिरीष देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती. विधी शाखेतून वकिली व्यवसायात प्रवेश करताना कठोर परिश्रम आवश्यक आहेत. यशासाठी कुठल्याही शॉर्टकटचा वापर करू नका, असा सल्ला मनोहर यांनी यावेळी दिला. जुन्या वकिलांमध्ये इंग्रजी भाषेप्रमाणेच प्रादेशिक भाषेवरही प्रभुत्व दिसून यायचे. परंतु आताच्या काळात केवळ इंग्रजीच चांगले असते. त्यामुळे नवीन वकिलांसमोर प्रादेशिक भाषेवर प्रभुत्व मिळविण्याचे मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन डॉ. देशपांडे यांनी केले.विधी पदवी मिळाल्यानंतर वकिली करण्याऐवजी कॉर्पोरेट क्षेत्रात सल्लागार म्हणून जाण्याकडे कल दिसून येत आहे. शिक्षणात स्थानिक कायद्यांना स्थान देणे अपेक्षित आहे. तसेच प्रकरणाचा ‘ड्राफ्ट’ तयार करण्यासंदर्भात विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असेदेखील ते म्हणाले. विधी महाविद्यालयांकडे काही प्रमाणात नेहमीच दुर्लक्ष होते. त्यामुळे लॉ युनिव्हर्सिटी आणि जिल्हास्तरावर ‘मॉडेल लॉ कॉलेज’ची निर्मिती करण्याची गरज असून यासंदर्भात पुढाकार घ्यावा, अशी विनंती डॉ. कोमावार यांनी सुनील मनोहर यांना केली. शिक्षण संस्थांची संख्या वाढते आहे, मात्र दर्जा सुमार होतो आहे याबद्दल कोमावार यांनी खंत व्यक्त केली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रवीणा खोब्रागडे यांनी प्रास्ताविक केले. संचालन पॅमेला डिसूझा आणि गौरी पुरोहित यांनी केले तर राजसी मार्डीकरने आभार मानले.‘जस्टा कॉजा’मध्ये विविध शहरांतील विधी महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. महोत्सवादरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात राष्ट्रीय विधी सेमिनारचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ‘मूट कोट’ स्पर्धा महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)