शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अदासा तीर्थक्षेत्रात होणार ॲडव्हेंचर पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 19:32 IST

Nagpur News नागपूर जिल्ह्यातील आदासा या तीर्थक्षेत्री ॲडव्हेंचर पार्क बनविण्याचे नियोजन असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली.

ठळक मुद्दे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार

नागपूर : श्री क्षेत्र अदासा हे तीर्थक्षेत्र भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यांना सर्व सोयी-सुविधा मिळण्याच्या दृष्टीने तीर्थक्षेत्राचा विकास होणे गरजेचे आहे. त्याबरोबरच पर्यटनासाठी हे क्षेत्र महत्त्वाचे असल्याने येथे ॲडव्हेंचर पार्कची निर्मिती करण्यात येणार असून, विविध खेळाच्या पार्क निर्मितीतून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी आशा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केली.

श्री क्षेत्र अदासा येथील तीर्थक्षेत्र विकासाबाबत सादरीकरण द विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन येथील कार्यालयात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. सहायक वनसंरक्षक पालवे, एनएमआरडीएच्या अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, वास्तुविशारद भिवगडे तसेच समाजिक वनीकरण विभाग व संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मनीष भारद्वाज यांनी सादरीकरणाद्वारे क्षेत्राच्या पर्यटनविषयक आराखड्याबद्दल अवगत केले. या क्षेत्रात भव्य कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात येणार असून, त्या आतील भागात खेळाचे पार्क व बाहेरील भागात फुटबॉल हॉर्स रायडिंग, ५५ हेक्टर जमिनीवर वन्यजिवांकरिता ठेवण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी विविध प्रकारची वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. विविध प्रकारचे खाद्यान्नाचे स्टाॅल, पेंचमध्ये सौर ऊर्जेवर चालणारी नाव आहे. त्याच धर्तीवर येथेही तयार करण्याचे ठरविले आहे. स्काय सायकल, मल्लखांब व जिम्नॅस्टिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पेटी झु, एरो स्पोर्ट प्रामुख्याने परदेशात प्रसिद्ध आहे ते सुद्धा येथे आणण्याचा प्रयत्न आहे. या आराखडयानुसार विकासात्मक योजना राबविल्या तर निश्चितच भाविक व पर्यटकांना हे तीर्थक्षेत्र भावेल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदार