शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

दिव्यांगांसाठी अत्याधुनिक केंद्र

By admin | Updated: June 5, 2017 02:12 IST

दिव्यांग व्यक्तींना विकासाची संधी देणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. दिव्यांगांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असून नागपूर शहरात त्यांच्यासाठी राष्ट्रीय केंद्र सुरू करण्यात आले ही आनंदाची बाब आहे.

थावरचंद गेहलोत : दिव्यांग व्यक्तींच्या संमिश्र प्रादेशिक केंद्राचे भूमिपूजनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिव्यांग व्यक्तींना विकासाची संधी देणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. दिव्यांगांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असून नागपूर शहरात त्यांच्यासाठी राष्ट्रीय केंद्र सुरू करण्यात आले ही आनंदाची बाब आहे. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व सोयीसुविधा असलेले अत्याधुनिक केंद्र उभारण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी दिले. दिव्यांग व्यक्तींच्या संमिश्र प्रादेशिक केंद्राचा भूमिपूजन सोहळा रविवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील ‘टीबी वॉर्ड’ येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते.यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा. डॉ.विकास महात्मे, आ. सुधाकर देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. दिव्यांग व्यक्तींमधील गुणांची पारख होऊन त्यांच्या नेतृत्वाला वाव दिला पाहिजे. ते स्वावलंबी व्हावेत, तसेच त्यांचे पुनर्वसन व्हावे हा या केंद्राचा उद्देश असेल. नागपुरातील राष्ट्रीय केंद्राला २०१६ मध्ये शासनाने मान्यता दिली होती. त्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे गेहलोत यांनी सांगितले. या संमिश्र प्रादेशिक केंद्रात दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. पुनर्वसनासाठी कंपोजिट रिजनल सेंटरचा आराखडा तयार करण्यात आला आहे. देशात सात राष्ट्रीय केंद्र कार्यरत आहेत. त्यानंतर आठवे केंद्र नागपुरात सुरू होत आहे. दिव्यांग व्यक्तींकरिता आवश्यक विकासाच्या संसाधनांची निर्मिती करणे, पायाभूत सेवा सुविधा पुरविणे हा केंद्राचा मुख्य उद्देश आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.या केंद्रात पुनर्वसन चिकित्सा, व्यवसाय प्रशिक्षण, वाचा श्रवण आणि संभाषण विशेष शिक्षण, बधिर, अंधत्व व्यक्तींना प्रशिक्षण, शारीरिक आणि भौतिक उपचार, प्रोस्थेटिक्स आणि आॅर्थोटिक्स, समुदाय आधारित पुनर्वसन, कृत्रिम अवयव आणि चलनवलन यंत्र, समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला मनपाचे सत्तापक्ष नेता संदीप जोशी, पंडीत दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे संचालक डॉ. विरल कामदार, सामाजिक न्याय विभागाच्या सहसचिव डॉ. डॉली चक्रवर्ती, राष्ट्रीय बहुविकलांग व्यक्ती अधिकारिता संस्थान चेन्नईचे हिमांशू दास, कंपोजिट रिजनल सेंटरचे संचालक डॉ. गुरबक्ष जगोटा उपस्थित होते. याप्रसंगी दिव्यांग व्यक्तींच्या संमिश्र प्रादेशिक केंद्राच्या शिलान्यासाचे अनावरण करण्यात आले.