शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडून मिळणार अ‍ॅडव्हान्स औषधे : राज्य कामगार विमा योजना आयुक्तांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:57 IST

राज्य कामगार आयुक्तालयामार्फत नागपूर विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या १७ सेवा दवाखान्यांमधील औषधांचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्राची मदत घेतली जाणार आहे. साधारण एक महिन्यात पुढील तीन महिन्यांची ‘अ‍ॅडव्हान्स’ औषधे उपलब्ध करून दिली जाईल, जिथे डॉक्टर नाहीत तिथे ‘बॉण्डेड’ डॉक्टरांची नियुक्ती करून रुग्णसेवा सुरळीत केली जाईल, सेवा दवाखान्यांचा दर्जा सुधारला जाईल, अशी ग्वाही राज्य कामगार विमा योजना आयुक्त ए.बी. धुळाज यांनी दिली.

ठळक मुद्देराज्य कामगार सेवा दवाखान्यांचा दर्जा सुधारणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य कामगार आयुक्तालयामार्फत नागपूर विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या १७ सेवा दवाखान्यांमधील औषधांचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्राची मदत घेतली जाणार आहे. साधारण एक महिन्यात पुढील तीन महिन्यांची ‘अ‍ॅडव्हान्स’ औषधे उपलब्ध करून दिली जाईल, जिथे डॉक्टर नाहीत तिथे ‘बॉण्डेड’ डॉक्टरांची नियुक्ती करून रुग्णसेवा सुरळीत केली जाईल, सेवा दवाखान्यांचा दर्जा सुधारला जाईल, अशी ग्वाही राज्य कामगार विमा योजना आयुक्त ए.बी. धुळाज यांनी दिली.राज्यातील कामगार विमा योजना रुग्णालयाचे कामकाज, बांधकाम व सेवा दवाखान्यांचा आढावा आयुक्त धुळाज यांनी मंगळवारी घेतला. तब्बल पाच तास त्यांनी विविध विषयांवर बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्याची माहिती आहे.साडे तीन कोटींच्या कामांना वेग देणार‘लोकमत’शी बोलताना आयुक्त धुळाज म्हणाले, कामगार विमा रुग्णालयासह काही सेवा दवाखान्यांच्या संरक्षण भिंतीपासून ते नूतनीकरणाचे तब्बल साडे तीन कोटींची कामे सुरू आहेत. आज झालेल्या बैठकीत बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना मार्च महिन्यापूर्वी बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.बंद झालेल्या सेवा दवाखान्यांचा प्रस्तावमहाल, नंदनवन, रामबाग, गणेशपेठ आणि सोमवारीपेठ येथील पाच सेवा दवाखाने, तर अकोल्यातील एमआयडीसी आणि जुना अकोला येथील बंद पडलेल्या सेवा दवाखान्यांविषयी आयुक्त धुळाज यांनी माहिती घेतली. रुग्णसंख्या रोडवल्याने हे सेवा दवाखाने बंद पडल्याचे सांगण्यात आले. यावर त्यांनी यातील किती दवाखाने सुरू करता येईल, याचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले.बॉण्डेड डॉक्टरांची भरती करणारकामगार विमा रुग्णालयासह सेवा दवाखान्यांमधील डॉक्टरांची रिक्त पदे भरून काढण्यासाठी बॉण्डेड डॉक्टरांची भरती केली जाणार असल्याची माहिती आयुक्त धुळाज यांनी दिली. ते म्हणाले, कंत्राटी डॉक्टर तीन-तीन महिन्यांच्या सुट्यांवर जातात. यामुळे रुग्णसेवा अडचणीत येते. यावर उपाय म्हणून एक वर्षासाठी बॉण्डेड डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.उशिरा येणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईआयुक्त धुळाज नागपुरात असतानाही सोमवारीपेठेतील राज्य कामगार विमा रुग्णालयातील काही कंत्राटपद्धतीवर असलेले ‘स्पेशालिस्ट डॉक्टर’ सकाळी १० वाजेनंतरच बाह्यरुग्ण विभागात पोहचले. याची माहिती स्वत: आयुक्तांनी घेतली. उशिरा येणाऱ्या डॉक्टरांसोबतच ते उशिरा येत असतानाची माहिती दडवून ठेवणाऱ्या वरिष्ठांवरही आता कारवाई केली जाईल, असेही आयुक्त धुळाज यांनी सांगितले.

 

टॅग्स :Employeeकर्मचारीhospitalहॉस्पिटल