शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

अ‍ॅड. सुहासिनी साखरे यांचे अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:56 IST

रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर कार धडकून अ‍ॅड. सुहासिनी त्र्यंबकराव साखरे (४४) रा. गणेश अपार्टमेंट खामला, नागपूर यांचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देपिपळा परिसरातील घटना : कार ट्रकवर आदळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर कार धडकून अ‍ॅड. सुहासिनी त्र्यंबकराव साखरे (४४) रा. गणेश अपार्टमेंट खामला, नागपूर यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर-सावनेर मार्गावरील पिपळा (डाकबंगला) परिसरात गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास घडली.ज्येष्ठ समाजसेविका डॉ. सीमा साखरे यांच्या त्या कन्या होत. कायदेविषयक प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक चळवळीला मार्गदर्शन करणाºया प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. सुहासिनी साखरे यांच्या निधनामुळे सीमातार्इंचा सामाजिक वारसा हरविला आहे.या घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून अ‍ॅड. साखरे यांचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. अ‍ॅड. साखरे या अविवाहित होत्या.सात वर्षांआधी त्या लंडनमध्ये वकिली व्यवसाय करायच्या. सध्या त्या नागपुरात स्थायिक झाल्या होत्या. व्यवसायासंबंधाने पुढच्या महिन्यात त्या सॅनफ्रान्सिस्कोला जाणार होत्या. परंतु त्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.अ‍ॅड. सुहासिनी साखरे या एमएच-३१/डीव्ही-७१८० क्रमांकाच्या नॅनो कारने सावनेरहून नागपूरकडे येत होत्या. पिपळा (डाकबंगला) परिसरातील पुलावर रोडच्या कडेला एमएच-४०/एन-३४५३ क्रमांकाचा ट्रक नादुरुस्त स्थितीत उभा होता. दरम्यान, अ‍ॅड. साखरे यांची कार या ट्रकवर मागून जोरात धडकली. त्यात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.