शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतींवर ‘प्रशासक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 22:11 IST

Gram panchayats,Administrators,Nagpur News जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १३० ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक केली आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

ठळक मुद्देविस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती : राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १३० ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक केली आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता सार्वजनिक निवडणुका रद्द झाल्या आहेत. त्यामुळे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांच्या नियुक्त्या करण्याचे न्यायालयाचे निर्देश आहेत. दरम्यान, सुरुवातीला राज्य शासनाने निर्णय घेत पालकमंत्री यांच्याशी सल्लामसलत करून जि.प.च्या सीईओंनी गावातील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. सत्ताधाऱ्यांनी तर प्रशासक होऊ इच्छिणाऱ्यांची यादीही तयार केली होती. परंतु राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नियुक्तीबाबत आक्षेप घेण्यात आले. हे प्रकरण न्यायालयातही गेले. उच्च न्यायालयाने या प्रकरणात खासगी व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यास मनाई केली व सरकारी व्यक्तीची नियुक्तीचे आदेश सीईओेंना दिले. त्यानुसार एप्रिल महिन्यात मुदत संपलेल्या हिंगणा तालुक्यातील सातगाव वेना या ग्रा.पं.वर प्रशासक म्हणून आरोग्य विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. तर ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील २९ व सप्टेंबरमध्ये १०० ग्रामपंचायतींची मुदत संपली. येथेही प्रशासक म्हणून प्रशासनातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.जिल्ह्यात १३० ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने तिथे प्रशासक म्हणून नियुक्तीसंदर्भात सुरुवातीला स्पष्ट सूचना नव्हत्या. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार व सीईओंच्या मार्गदर्शनात कृषी, पंचायत सांख्यिकी, आरोग्य आदी विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.राजेंद्र भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकार, पंचायत विभाग, जि.प.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतnagpurनागपूर