शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतीवर प्रशासकाची होणार नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 20:45 IST

नागपूर जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ येत्या ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. कोरोनाच्या कालावधीत निवडणुका घेणे शक्य नसल्याने न्यायालयाने विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने प्रशासक नियुक्तीची कार्यवाही सुरू केली आहे.

ठळक मुद्दे विस्तार अधिकारी होणार प्रशासक : ग्रामपंचायतीची मुदत संपतेय

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ येत्या ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. कोरोनाच्या कालावधीत निवडणुका घेणे शक्य नसल्याने न्यायालयाने विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने प्रशासक नियुक्तीची कार्यवाही सुरू केली आहे.३०ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील २८ तर ३० सप्टेंबर रोजी १०० ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपत आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता सार्वजनिक निवडणुका रद्द झाल्या आहेत. त्यामुळे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. दरम्यान, सुरुवातीला राज्य शासनाने निर्णय घेत पालकमंत्री यांच्याशी सल्लामसलत करुन जि.प.च्या सीईओंनी गावातील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. यावरुन मोठी चर्चा झाली होती, सत्ताधाऱ्यांनी तर प्रशासक होऊ इच्छिणाऱ्यांची यादीही तयार केली होती. मात्र, राज्यात यावर आक्षेप घेत हे प्रकरण न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणात खासगी व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यास मनाई केली व सरकारी व्यक्तीच्या नियुक्तीचे आदेश सीईओेंना दिले होते. दरम्यान, एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील सातगाव वेणा या ग्रा.पं.ची मुदत संपल्यानंतर तेथे प्रशासक म्हणून आरोग्य विस्तार अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्ह्यातील जवळपास १२८ वर ग्रा.पं.ची मुदत संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर टप्प्याटप्प्याने प्रशासकांची नियुक्ती केली जात आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर हे ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे लवकरच आदेश जारी करणार असल्याची माहिती आहे.विस्तार अधिकाऱ्याची पदे कमीपंचायत समिती अंतर्गत कार्यरत विस्तार अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने एका विस्तार अधिकाऱ्याला दोन ते तीन ग्रामपंचायतीचा प्रभार देण्यात येऊ शकतो. तसेच काही जिल्ह्यात तर शाखा अभियंत्यालाही प्रशासक पदावर नियुक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतnagpurनागपूर