शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Maharashtra Assembly Election 2019 : निवडणुकीसाठी प्रशासनाचा 'मॅनेजमेंट प्लॅन' तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 21:13 IST

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकही शांततेत पार पडेल, यासाठी प्रशासनाचा ‘इलेक्शन मॅनेजमेंट प्लॅन’ तयार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देआचारसंहिता लागू, प्रशासन सज्ज : २१,९७० अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात शनिवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकही शांततेत पार पडेल, यासाठी प्रशासनाचा ‘इलेक्शन मॅनेजमेंट प्लॅन’ तयार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले की, जिल्ह्यात १२ विधानसभा मतदार संघ आहे. या १२ ही ठिकाणी मतदान व मतमोजणी होईल. निवडणुकीच्या कामासाठी एकूण २१९७० अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून ते सर्व उपलब्ध आहेत. यासोबतच ४३८२ अधिकारी-कर्मचारी हे रिझर्व्ह म्हणून ठेवण्यात आले आहे. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त यासर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे तीन टप्प्यात प्रशिक्षण होणार आहे. पहिल्या टप्प्याच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरावरचे प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाºयांकडून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. २७ तारखेपर्यंत ते चालणार आहे. दक्षता पथकही तयार करण्यात आले आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात चार दक्षता पथक नियुक्त करण्यात येणार असून प्रत्येक पथकात चार ते पाच कर्मचाºयांचा समावेश राहिल. तसेच कॅमेरा आणि सांख्यिकी पथकसुद्धा असेल. मध्य प्रदेशातील दोन जिल्हे लागून आहे. या जिल्ह्यातून कोणत्याही प्रकारची तस्करी होता कामा नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, शिरिष पांडे आदी उपस्थित होते.५५ संवेदनशील मतदान केंद्रनिवडणुकीसाठी ४४१२ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून यातील ५५ केंद्र संवेदनशील आहे. या संवेदनशील मतदार केंद्रावरून सीसीटीव्ही लावण्यात येणार असून अतिरिक्त सुरक्षा देण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे वेब कास्टींग करण्यात येणार आहे.लोकसभेच्या तुलनेत ३० मतदान केंद्र अधिक आहेत. एका विधानसभा संघात एक केंद्र विशेष महिलांचे असणार आहे.७७२१ बॅलेट युनिटची गरजनिवडणुकीकरता ७७२१बॅलेट युनिट तर ५५१५कंट्रोल युनिट आवश्यक आहे. प्रशासनाकडे ८१८०बॅलेट युनिट आणि ८८८३ कंट्रोल युनिट आहेत. ५९५६ व्हीव्हीपॅट मशीन असून १०३ मशीन कमी आहेत. आंध्र प्रदेशकडून २८० व्हीव्हीपॅट मशीन मागविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मुद्गल यांनी सांगितले.८९०२ पोलिंग एजंट राजकीय पक्षाकडून नियुक्तराजकीय पक्षांकडून ८९०२ पोलिंग एजंटची नियुक्ती केली आहे. यात सर्वाधिक ४२१६ एजंटची नियुक्ती भाजपने केली आहे. तर ३४३४ कॉंग्रेस, बसपने २०० तर सेनाने ४४७ एजंटची नियुक्ती केल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात ७८ हजार मतदार वाढले

 लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर जिल्ह्यात तब्बल ७८ हजार ५७५ मतदार वाढले आहेत. यामध्ये तब्बल ७३९३६ मतदार हे १८ ते १९ वयोगटातील म्हणजे नवमतदार आहेत. यातही महिला मतदारांची संख्या अधिक आहे, हे विशेष.  जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की,  गेल्या ३१ आॅगस्ट रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिध्द केलेल्या यादीत जिल्ह्यात ४१ लाख ६३ हजार ३६७ मतदार आहे. यात पुरुष २१ लाख ३१ हजार १४९, महिला २० लाख ३२ हजार ११८ व १०० तृतिय पंथीय मतदात्यांचा समावेश आहे.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर विशेष मोहिमेंतर्गत मतदारांची भर पडली असून ७८ हजार ५२५ नवमतदार वाढले आहे. त्यात ३६ हजार ४०९ पुरुष व ४२ हजार ११२ महिला मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे १८ ते १९ वयोगटातील ६३ हजारांनी मतदार वाढले असून यंदाच्या विधानसभेत ७३ हजार ९३६ नवमतदारांचा समावेश आहे. त्यांना आकर्षित करण्यावर विशेष भर राजकीय पक्षांचा राहणार आहे. ८ हजार ८३७ मतदार वगळलेलोकसभा निवडणुकीनंतर ८ हजार ८३७ मतदार वगळण्यात आले. त्यात ५ हजार ७०८ मृत असून १ हजार ४५३ स्थलांतरित व ८७६ डुप्लिकेट मतदार आढळून आले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019collectorजिल्हाधिकारीnagpurनागपूरMediaमाध्यमे