लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत म्युकरमायकाेसिस हा आजार लहान मुलांना हाेण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हा परिषद आराेग्य यंत्रणा कामाला लागली आहे. त्यादृष्टीने तालुकास्तरावर आराेग्य यंत्रणा व स्थानिक प्रशासनाने सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहे.
वानाडाेंगरी नगर परिषद व हिंगणा नगर पंचायत कार्यालयात मंगळवारी (दि.८) जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी भेट दिली. त्यानंतर हनुमानगड मंदिर येथे आयाेजित काेराेनाबाबत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
या बैठकीत हिंगणा तालुक्यातील काेराेनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येचा आढावा घेतला. आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने यात लहान मुलांना बाधा हाेण्याची भीती व्यक्त हाेत आहे. तसेच म्युकरमायकाेसिस आजारसुद्धा बळावला आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आराेग्य विभागाने विविध उपाययाेजना केल्या आहेत. आराेग्य विभागाच्या सूचनेनुसार तालुक्यातील आराेग्य यंत्रणा व स्थानिक स्वराज्य संस्थांनी तिसरी लाट थाेपवण्यासाठी तत्पर राहावे. व्यापाऱ्यांनी दर १५ दिवसात काेविड चाचणी करावी, गर्दी करू नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. बैठकीदरम्यान फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकाेरपणे पालन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी इंदिरा चाैधरी, तहसीलदार संताेष खांडरे, मुख्याधिकारी राहुल परिहार, नगराध्यक्ष छाया भाेसकर यांच्यासह पदाधिकारी, आशावर्कर, अंगणवाडी सेविका आदींची माेठ्या संख्येत उपस्थिती हाेती.