शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे समायोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 01:17 IST

राज्य आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे १०० टक्के समायोजन करण्याच्या मागणीला घेऊन आरोग्य विभाग कंत्राटी अधिकारी व कर्मचारी कृती समितीने शुक्रवारी विधिमंडळावर हल्लाबोल मोर्चा काढला.

ठळक मुद्देविधिमंडळावर मोर्चाची धडक : आरोग्य विभाग कंत्राटी अधिकारी व कर्मचारी कृती समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे १०० टक्के समायोजन करण्याच्या मागणीला घेऊन आरोग्य विभाग कंत्राटी अधिकारी व कर्मचारी कृती समितीने शुक्रवारी विधिमंडळावर हल्लाबोल मोर्चा काढला. येत्या निवडणुकांपूर्वी समायोजन न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही मोर्चेकऱ्यांनी दिला.राज्य आरोग्य विभागात १ लाख ७७ हजारांपेक्षा जास्त विविध पदे रिक्त आहेत. यांच्या कामाच्या ताणांसह मूळ कामांचा भार एनएचएम, आयपीएचएस, आरएनटीसीपी, एनयुएचएम, एमएसएएसी, आरबीएसके, आयुष व लॅप्रसी आदी २५ हजार कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आहे. गेल्या २० वर्षांपासून ११ महिन्याच्या कंत्राटावर हे अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. यातील ४५ टक्के कर्मचाऱ्यांनी आपल्या वयाची ४५ ओलांडली आहे. यातच अतिसंसर्गजन्य रुग्णाच्या सेवेत व संपर्कात आल्याने १५४ च्यावर कर्मचारी विविध आजाराने पीडित आहेत तर ११२ वर कंत्राटी कर्मचारी विविध संसर्गजन्य आजाराने मृत्यू पावले आहेत. शासनाच्या तुटपुंज्या मानधनावर रुग्णांचे हित जोपासणे कठीण झाल्याने सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समायोजन करा, अशी मागणी या मोर्चात लावून धरल्याचे गोपाल श्रीमंगले यांनी सांगितले. पंजाब, हरियाणा, दिल्ली सरकारने ‘समान काम, समान वेतन’नुसार अंमलबजावणी केली आहे. परंतु महाराष्ट्रात अद्यापही याची अंमलबजावणी झाली नसल्याची खंतही श्रीमंगले यांनी बोलून दाखवली.मोर्चाच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना दिले. त्यांनी अधिवेशनानंतर तातडीने यावर बैठक लावून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. होऊ घातलेल्या निवडणुकांपूर्वी समायोजन न झाल्यास आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी सहकुटुंब मतदानावर बहिष्कार टाकू, अशी शपथही यावेळी घेतली. मोर्चाचे नेतृत्व समितीचे कार्यकारी अध्यक्ष कमलेश गजबे, अध्यक्ष मंगेश गावंडे, संजय जीवतोडे व गोपाल श्रीमंगले यांनी केले.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा