शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅड. अतुल पांडे हायकोर्ट बारचे नवे अध्यक्ष; सचिवपदी अ‍ॅड. अमोल जलतारे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 21:34 IST

Nagpur News हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. अतुल पांडे तर, सचिवपदी अ‍ॅड. अमोल जलतारे यांनी विजय मिळविला. असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक शनिवारी पार पडली.

नागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. अतुल पांडे तर, सचिवपदी अ‍ॅड. अमोल जलतारे यांनी विजय मिळविला. असोसिएशनच्या कार्यकारीनीची निवडणूक शनिवारी पार पडली.

१६ पदांसाठी झालेल्या या निवडणूकीत ३७ उमेदवार रिंगणात उतरले होते.  अध्यक्षपदासाठी चार उमेदवारांमध्ये लढत झाली. त्यातील अ‍ॅड. अतुल पांडे यांनी ५५४ मते घेत दमदार विजय मिळविला. अ‍ॅड. समीर सोहनी यांनी ४७६, अ‍ॅड. श्रीधर पुरोहित यांनी ४४२ तर अ‍ॅड. व्ही. जी. भांबुरकर यांनी २९ मते मिळविली. सचिवपदासाठी अ‍ॅड. अमोल जलतारे आणि अ‍ॅड. ऋग्वेद ढोरे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. यात अ‍ॅड. जलतारे ७८२ मते घेत विजयी झाले. अ‍ॅड. ढोरे यांनी ७०४ मते मिळविली.  उपाध्यक्षपदी अ‍ॅड. पी. एस. तिडके आणि अ‍ॅड. एस. एन. भट्टड, कोषाध्यक्षपदी अ‍ॅड. एम. डी. लाखे, सहसचिवपदी अ‍ॅड. पी. एस. चव्हाण तर ग्रंथालय प्रभारीपदी अ‍ॅड. व्ही. एस. ओबेराय यांनी विजय मिळविला. नऊ कार्यकारी सदस्यपदाकरिता झालेल्या निवडणूकीची मतमोजणी रात्री उशीरापर्यंत सुरू होती. निकाल जाहीर होताच उच्च न्यायालय परिसरात विजयी उमेदवारांच्या वकिलांनी एकच जल्लोष केला.

हा सर्व मित्रांचा विजय- अ‍ॅड. पांडेमाझ्या पाठिशी उभ्या असलेल्या सर्व सहकारी आणि मित्रांचा हा विजय आहे. त्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे असे मत अध्यक्षपदी विजयी झालेले अ‍ॅड. अतुल पांडे यांनी व्यक्त केले. सर्व ज्युनिअर वकिलांना न्यायालयात बसण्याची व्यवस्था केली जाईल. महिला वकिलांच्या समस्या मार्गी लावू. स्टडी सर्कलचाही उपक्रम अधिक जोमाने सुरू करण्यावर भर दिला जाईल असेही ते म्हणाले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय