शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

‘सोशल कनेक्ट’ मित्रांच्या मदतीचा ‘अ‍ॅक्टिव्ह’ सेतू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 05:01 IST

फोनवर डॉक्टरांचा सल्ला : ज्येष्ठांना औषध व अन्नदानही; अफवा नियंत्रणाचीही यंत्रणा

निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुणाला वैद्यकीय सेवेची गरज आहे. कुणाला तातडीने औषध हवे आहे. डॉक्टरांचा सल्ला हवा आहे. कुणी भुकेने व्याकूळ आहेत. जेवणाचा डबा हवा आहे.‘सोशल’ विचारांचा हा ग्रुपतातडीने ‘अ‍ॅक्टिव्ह’ होतो अन् मदतीलाधावून जातो. ही सेवा तातडीने दिलीजातेच. शिवाय मदतीनंतर ‘अ‍ॅप्रिसिएट’ही केले जाते.या मदतीच्या सेतूमुळे संकटाची प्रत्यक्ष झळ पोहचलेल्यांसाठी मदतीचे असंख्य हात पुढे सरसावले आहेत. सोशल मीडियावर एकीकडेअफवांचे पेव फुटले असतानायाच सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार झालेला हा सेतू आदर्श ठरला आहे.नागपूरच्या काही तरुणांनी असा देशव्यापी ग्रुप तयार करून या माध्यमातून भुकेल्यांना अन्न, आजारी लोकांच्या प्राथमिक उपचारासाठी डॉक्टरांची मदत, ज्येष्ठांसाठी औषधांचा पुरवठा आणि गरजवंतांना हवी ती मदत पोहचविण्याचा वसा घेतला आहे. खोटी माहिती पसरविणाऱ्या संदेशांची पोलखोल करण्यासाठी खरेतर या ग्रुपची निर्मिती झाल्याचे डॉ. अभिक घोष यांनी सांगितले.आलेल्या संदेशाला इंटरप्रीट करून त्यातील खरेपणा लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरूकरण्यात आले. त्यासाठीमाध्यम तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला. पुढे मात्र या कामाची व्याप्ती वाढत गेली.‘डॉक्टर्स आॅन कॉल’ सेवा‘डॉक्टर्स आॅन कॉल’ ही सेवा सुरू करण्यात आली. कोणत्याही आजारामध्ये प्राथमिक उपचार मिळेल, यासाठी ग्रुपमध्ये असलेले तरुण डॉक्टर्स मदतीसाठी पोहचू लागले.कौन्सिलर्सचीही मदतलोकांची भीती दूर करण्यासाठी ग्रुपमधल्या ५ मानसोपचारतज्ज्ञ आणि २५ कौन्सिलर्सची मदत घेतली जात आहे. औषधोपचार आणि जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करण्याची सेवाही राबविली आहे. भुकेल्या गरजूंपर्यंत दररोज २०० पॅकेट्स शिजलेले अन्न पोहचविण्याची सेवाही सुरू झाली. ग्रुपमधील जवळपास १८० सदस्यांच्या संपर्कातूनच हे सर्व सेवाकार्य चालले आहे.पीपीई कीटचे काम सुरूकाही आर्थिक संपन्न व्यक्तींनी या प्रत्येक कामासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या ग्रुपमधील जाणकारांनी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट तयार करण्याचे कामही सुरू केले आहे. अडचणीत फसलेल्या इतर शहरांतील लोकांना त्या त्या शहरातील सदस्यांद्वारे तातडीची मदत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही डॉ. घोष यांनी स्पष्ट केले.