शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वीज मीटरचे रीडिंग चुकल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 20:58 IST

‘वीजग्राहकांच्या मीटरचे चुकीचे रीडिंग घेतल्यामुळे ग्राहकांना त्रास होऊन ‘महावितरण’चा महसूलही बुडत असल्याने चुकीचे रीडिंग घेतल्यास संबंधित मीटर रिडींग एजन्सीविरुद्ध कारवाई करण्यास कुचराई करणाऱ्या कुठल्याही बिलींग कर्मचाऱ्याला पाठीशी घालणार नसल्याचे स्पष्ट संकेत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहे.

ठळक मुद्देनागपूर परिक्षेत्र आढावा बैठक : भालचंद्र खंडाईत यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘वीजग्राहकांच्या मीटरचे चुकीचे रीडिंग घेतल्यामुळे ग्राहकांना त्रास होऊन ‘महावितरण’चा महसूलही बुडत असल्याने चुकीचे रीडिंग घेतल्यास संबंधित मीटर रिडींग एजन्सीविरुद्ध कारवाई करण्यास कुचराई करणाऱ्या कुठल्याही बिलींग कर्मचाऱ्याला पाठीशी घालणार नसल्याचे स्पष्ट संकेत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहे. वारंवार सूचना देऊनही कामात सुधारणा न करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.कामचुकार मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध महावितरणने कठोर कारवाईचा पवित्रा घेतला आहे, वीजवापरानुसार योग्य व अचूक वीजबिल ग्राहकांना देण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी मीटर रीडिंगच्या प्रक्रियेत कोणतीही हयगय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अन्यथा संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केल्या जाईल. असेही खंडाईत यांनी यावेळी सांगितले, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या नागपूर, चंद्र्रपूर, गोंदिया, अकोला आणि अमरावती या पाचही परिमंडळातील सर्व वरिष्ठ अभियंते, मानव संसाधन विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, वित्त व लेखा विभाग आणि जनसंपर्क विभागातील सर्व अधिकाऱ्यांच्या संयुक्त आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते.यावेळी महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार यांनी एप्रिल पासून लागू होणाऱ्या नवीन बिलिंग प्रणालीवर विस्तृत प्रकाश टाकला. तसेच होणाऱ्या खर्चात कपात करण्यासंबंधीच्या परिपत्रकाचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही दिले. याशिवाय प्रभारी महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित विविध विषयांवरील सादरीकरण केले. याप्रसंगी मुख्य अभियंते रफिक शेख, सुहास रंगारी, अरविंद भादीकर, दिलीप घुगल, सुहास मेत्रे आणि सुरेश मडावी, उप महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, आणि पाचही परिमंडळातील अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंत्यांसह मानव संसाधन, माहिती तंत्रज्ञान, वित्त व लेखा आणि जनसंपर्क विभागातील अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर