शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

श्री राम सेलिब्रेशनच्या अनधिकृत सभागृहावर नासुप्रची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:06 IST

मानेवाडा येथील लाडीकर ले-आऊट नागरिक विकास समितीमधील भूखंड क्रमांक १५,१६,१७,१८ (पार्ट) या भूखंडावर बांधण्यात आलेले श्री राम सेलिब्रेशन व्यावसायिक उद्देशाने वापरण्यात येत होते. भूखंडधारकाने या सभागृहाचा बांधकाम नकाशा मंजूर न करून घेतल्याने ३ जून ते ५ जूनदरम्यान या ठिकाणी नासुप्रतर्फे अतिक्रमण हटविण्यात आले होते, तर उर्वरित अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी बुधवारी कारवाई करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानेवाडा येथील लाडीकर ले-आऊट नागरिक विकास समितीमधील भूखंड क्रमांक १५,१६,१७,१८ (पार्ट) या भूखंडावर बांधण्यात आलेले श्री राम सेलिब्रेशन व्यावसायिक उद्देशाने वापरण्यात येत होते. भूखंडधारकाने या सभागृहाचा बांधकाम नकाशा मंजूर न करून घेतल्याने ३ जून ते ५ जूनदरम्यान या ठिकाणी नासुप्रतर्फे अतिक्रमण हटविण्यात आले होते, तर उर्वरित अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी बुधवारी कारवाई करण्यात आली.सभागृहाचे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी नासुप्रतर्फे आज, गुरुवारीदेखील अतिक्रमण कारवाई करण्यात येणार आहे. इमारतीच्या पूर्वेकडे मंदिर असल्यामुळे या इमारतीचा काही भाग सोडण्यात आला होता. तसेच दक्षिणेकडे भूखंड क्रमांक १८ च्या बाजूला राहते घर असल्यामुळे हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे, इमारतीचा काही भाग सोडण्यात आला होता. इमारतीचा हा भाग लाडीकर यांनी तो स्वत: तोडून टाकायचा होता. मात्र तसे न करता व नागपूर सुधार प्रन्यासची परवानगी न घेता लाडीकर यांनी तुटलेला भाग काढून तिथे नव्याने भिंत बांधून पुन्हा अवैध बांधकाम केले. त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी नासुप्रतर्फे कारवाई करण्यात येत आहे. सदर कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी नासुप्रच्या दक्षिण विभागातील कार्यकारी अभियंता संजय चिमूरकर, विभागीय अधिकारी अनिल राठोड, सहायक अभियंता श्रेणी-२ संदीप राऊत, क्षतिपथक प्रमुख मनोहर पाटील तसेच हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यास