शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

चौघांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई

By admin | Updated: November 13, 2015 02:59 IST

दुखापत करून जबरी चोरी, खंडणी वसुली, खून यासह इतर गुन्हे संघटितपणे करणाऱ्या चार आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली.

२३ गुन्ह्यांची नोंद : वाडीसह परिसरात आरोपींची दहशतवाडी : दुखापत करून जबरी चोरी, खंडणी वसुली, खून यासह इतर गुन्हे संघटितपणे करणाऱ्या चार आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली. या चारही आरोपींना स्थानबद्ध करण्यात आले. वाडी, एमआयडीसीसह इतर पोलीस ठाण्यात या आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. प्रकाश शंकर बमनोटे (४५, रा. द्रुगधामणा, वडार मोहल्ला), दिनेश ऊर्फ दादू सुखदेव लांजेवार (२५, रा. राठी ले-आऊट, आठवा मैल, वाडी), राधेश्याम विठ्ठल उईके (२६, रा. द्रुगधामणा) आणि गिरधर रतिराम ठाकरे अशी आरोपींची नावे आहेत. प्रकाश बमनोटेविरुद्ध १९८६ पासून आजपर्यंत एकूण २३ गुन्ह्याची नोंद वाडी पोलीस ठाण्यात आहे. तो प्रमुख असलेल्या टोळीने आतापर्यंत खून, चोरी, सार्वजनिक ठिकाणी मारहाण, घरफोडी, अवैधरीत्या विना परवाना शस्त्र बाळगणे, दारूविक्री, जबरी चोरी, खंडणी वसूल करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, हप्ता वसुली अशाप्रकारचे गुन्हे केले. त्यामुळे समाजात दहशत निर्माण करून भीतीयुक्त वातावरण तयार झाले होते. कुख्यात गुंड भारत ताराचंद बन्सोड याचा २००८ मध्ये डिफेन्स परिसरातील खूनप्रकरणातही त्याचा हात होता. तसेच आॅगस्ट २०१५ मध्ये गणेशनगर झोपडपट्टी, आठवा मैल येथे यशोदा पाटील यांना मारहाण करून दागिने आणि रोख २२ हजार रुपये असा ऐवज या चार आरोपींनी लंपास केला होता. या प्रकरणात या चारही आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या चारही आरोपींमुळे समाजातील शांतता भंग होत असून भीतीचे वातावरण तयार झाले. त्यांच्यावर प्रतिबंधित कारवाई करूनही कोणताही परिणाम होत नसल्याने परिमंडळ क्र. १ चे पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे व एमआयडीसी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पी. जी. माने यांच्या मार्गदर्शनात वाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक वाय.एस. खरसान यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ अन्वये गुन्हा नोंदवून स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव दक्षिण विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत करवडे यांच्याकडे पाठविला. त्यास मंजुरी देण्यात येऊन या चारही आरोपींवर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही कारवाई परिमंडळ क्र. १ चे उपायुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनात वाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, दुय्यम पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक खरसान यांनी केली. (प्रतिनिधी)