शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

कुख्यात गुंड आंबेकरच्या बांधकामावर सलग पाचव्या दिवशी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 22:03 IST

इतवारी भागातील दारोडकर चौका लगतच्या इतवारी शाळेजवळ कुख्यात गुंड संतोष आंबेकर व अण्णाची मोझरकर यांनी बांधलेली बहुमजली अनधिकृत इमारत पाडण्याची कारवाई महापालिकेच्या प्रवर्तन विभागातर्फे सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इतवारी भागातील दारोडकर चौका लगतच्या इतवारी शाळेजवळ कुख्यात गुंड संतोष आंबेकर व अण्णाची मोझरकर यांनी बांधलेली बहुमजली अनधिकृत इमारत पाडण्याची कारवाई महापालिकेच्या प्रवर्तन विभागातर्फे सुरू आहे. सोमवारी सलग पाचव्या दिवशी या इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरील स्लॅब तसेच दक्षिण व उत्तर दिशेकडील भिंती तोडण्यात आल्या.आंबेकर याने महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केले होते. परंतु मागील अनेक वर्षात या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आलेली नव्हती. पोलिसांनी आंबेकरला अडट केल्यानंतर महापालिकेने त्याच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविला आहे.प्रवर्तन विभागाच्या दुसऱ्या पथकाने महाल झोन क्षेत्रातील सेवा सदन चौक गीतांजली टॉकीजकडे जाणाऱ्या गल्लीतील स्पे्र पेंटींग दुकानासमोरील लोखंडी ठेला हटविण्यासाठी पथक पोहचले असता दुकान मालकाने ४० ते ५० लोकांचा जमाव एकत्र करून कारवाईला विरोध दर्शविला. यामुळे कारवाई करता आली नाही. त्यानंतर पथकाने पन्नालाल देवडिया चौक येथील स्वेटर व कपडे विक्रे त्यांची दुकाने हटविली. तसेच पन्नालाल देवडिया शाळा ते नंगापुतळा परिसरातील संपूर्ण अतिक्रमण हटविण्यात आले.ही कारवाई प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त आशोप पाटील, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात नितीन मंथनवार, भास्कर मालवे, शाबाद खान, विशाल ढोले व पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर