शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

धरमपेठेतील अतिक्रमणावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:18 IST

धरमपेठ भागातील दुकानदारांनी फूटपाथ, रस्त्यावर बॅनर, पोस्टर, होर्डिंगच्या माध्यमातून केलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई आज सीताबर्डी पोलिसांनी केली.

ठळक मुद्देसिव्हीक अ‍ॅक्शन ग्रुपच्या तक्रारीवरून राबविली मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धरमपेठ भागातील दुकानदारांनी फूटपाथ, रस्त्यावर बॅनर, पोस्टर, होर्डिंगच्या माध्यमातून केलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई आज सीताबर्डी पोलिसांनी केली.आपले घर, परिसर घाण आणि अतिक्रमणापासून दूर ठेवल्यास शहर, राज्य आणि देशात ही समस्या दूर होऊ शकते. हेच ध्येय बाळगून नागपुरातील काही जागरुक नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी धरमपेठ भागातील नागरिकांनी ‘सिव्हीक अ‍ॅक्शन ग्रुप’ (सीएजी) तयार केला आहे. या ग्रुपने अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे तक्रार केली. परंतु हे अतिक्रमण हटविण्याचे काम महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने केले नाही. अखेर सीएजी ग्रुपने सीताबर्डी पोलिसात तक्रार केली. त्याचा परिणाम असा झाला की, गुरुवारी सायंकाळी सीताबर्डी पोलिसांनी धरमपेठ परिसरातील दुकानदारांनी बॅनर, पोस्टर, होर्डिंगच्या माध्यमातून रस्त्यावर, फुटपाथवर केलेल्या अतिक्रमणावर कारवाई केली. सीताबर्डीचे पोलीस निरीक्षक हेमंत खराबे यांच्या नेतृत्वात केलेल्या या कारवाईत जवळपास १० पोलीस कर्मचारी सहभागी झाले. पोलिसांनी झेंडा चौक ते कॉफी हाऊस चौकाच्या दिशेने जाणाºया रस्त्यावर अतिक्रमण हटविणे सुरु केले. येथे मोबाईल शोरूमचे फूटपाथवरील लोखंडाच्या अँगलच्या साहाय्याने लावलेले मोठे बोर्ड हटविण्याची विनंती पोलिसांनी दुकानदारांना केली. येथे एक मुव्हेबल बोर्डही हटविण्यात आले तसेच झाडावर लटकविलेले बोर्डही काढण्यात आले. पुढे एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे बोर्डही हटवून त्याचा लोखंडी पाईप जप्त करण्यात आला. तेथून पोलीस लक्ष्मीभुवन चौकाकडे वळले. येथेही दुकानदारांनी बोर्ड, पोस्टर, बॅनरसह इतर मार्गाने केलेले अतिक्रमण पोलिसांनी हटविले. येथे काही दुकानदारांनी त्याचा विरोध केला. त्यामुळे पोलीस आणि दुकानदारात वाद झाला. परंतु पोलीस निरीक्षक हेमंत खराबे यांनी दुकानदारांना सांगितले की, धरमपेठच्या नागरिकांच्या तक्रारीवरूनच पोलीस ही कारवाई करीत आहेत. त्यानंतर दुकानदार शांत झाले. ही कारवाई जवळपास तीन तास चालली.परिसर अतिक्रमणमुक्त ठेवणे दुकानदारांचीही जबाबदारीधरमपेठच्या सिव्हीक अ‍ॅक्शन ग्रुपच्या पदाधिकाºयांच्या मते आपला परिसर अतिक्रमणापासून मुक्त ठेवण्याची जबाबदारी दुकानदारांचीही आहे. त्यांनी आपल्या दुकानातील साहित्य, बोर्ड, बॅनर दुकानाच्या परिसरातच ठेवल्यास रस्ते, फुटपाथ अतिक्रमणमुक्त होऊन पायी चालणारे, वाहनचालकांना ये-जा करण्यास सुविधा होईल. वाहन ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल. त्यामुळे दुकानात ग्राहकांची संख्याही वाढण्यास मदत होईल.