शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विना नंबरप्लेट वाहन दिल्यास डिलरवर कारवाई : परिवहन विभागाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:17 IST

विना नंबरप्लेट वाहने रस्त्यावर धावत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याची दखल घेत विना नंबरप्लेट वाहन देणाऱ्यांना वाहन विक्रेत्यांवर (डिलर्स) कारवाई म्हणून १० हजारांपेक्षा जास्त रकमेचा दंड आकारण्याचे निर्देश परिवहन विभागाने आरटीओ कार्यालयांना दिले

ठळक मुद्दे१० हजारांपेक्षा जास्त रकमेचा दंड बसणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’ (एचएसआरपी) बंधनकारक करण्यात आले असलेतरी राज्यात शेकडो वाहनांना नंबरप्लेट मिळण्यास उशीर होत आहे. विना नंबरप्लेट वाहने रस्त्यावर धावत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याची दखल घेत विना नंबरप्लेट वाहन देणाऱ्यांना वाहन विक्रेत्यांवर (डिलर्स) कारवाई म्हणून १० हजारांपेक्षा जास्त रकमेचा दंड आकारण्याचे निर्देश परिवहन विभागाने आरटीओ कार्यालयांना दिले आहे. विक्री झालेली वाहने विनानंबर प्लेट शिवाय देऊ नये, असे आदेशही डिलर्सला देण्यात आले आहे. परंतु यात आरटीओ कार्यालयांकडूनच नव्या वाहनांची नोंदणी होण्यास व नंबर मिळण्यास उशीर होत असल्याचे सामोर आले आहे.राज्यात १ एप्रिल २०१९ पासून नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’ ची सक्ती करण्यात आली. परंतु पूर्वी वाहनांना ‘एचएसआरपी’ प्लेट लागेपर्यंत १५-२० दिवसांचा कालावधी लागायचा. या संदर्भाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी नंबरप्लेटच्या प्रक्रियेत काही सुधारणा केल्या. सोबतच‘एचएसआरपी’प्लेट पुरवठा करणाऱ्या पुरवठादार संख्या वाढविण्याच्या सूचना वाहन कंपन्यांना देण्यात आल्या. यामुळे नंबरप्लेट मिळण्याचा कालावधी आता आठ दिवसांवर आला आहे. परंतु परिवहन आयुक्तांनी काढलेल्या नव्या सूचनांमध्ये प्रलंबित असलेल्या वाहनांना दोन दिवसांत ‘एचएसआरपी’ प्लेट बसविण्याचे व ‘एचएसआरपी’प्लेट बसविल्याशिवाय वाहनांचा ताबा मालकांना देऊ नये असे निर्देश दिले. याचे उल्लंघन झाल्यास १० हजारांचा दंडही आकारण्याचा इशाराही देण्यात आला. यामुळे डिलर्समध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.यावर एका डिलर्सने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, डिलर्सकडून वाहनाची विक्री झाल्यानंतर त्याच दिवशी मोटार वाहन निरीक्षक वाहनाची तपासणी करीत नाही. ते दुसऱ्या दिवशी करतात. त्या दिवशी रात्री उशीरा ते संगणकावर तशी नोंद करतात. यामुळे तिसऱ्या दिवशी डिलर्सला ‘रोड टॅक्स’ भरावा लागतो. याच दिवशी किंवा चवथ्या दिवशी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहनांच्या कागदावर स्वाक्षरी करतात. पाचव्या दिवशी लिपीक वाहनांना नंबर देतो. डिलर्स त्यांच्या वाहनांना पडलेले नंबर ‘एचएसआरपी’प्लेट तयार करणाऱ्या सेवापुरवठादाराकडे पाठवितो. सहाव्या किंवा सातव्या दिवशी डिलर्सकडे ही नंबरप्लेट येते. त्याच दिवशी किंवा आठव्या दिवशी नंबर प्लेट लावली जाते. नंबरप्लेटवरील सोपस्कारासाठी आरटीओ कार्यालयच पाच दिवस घेते. परंतु दंडात्मक कारवाईची भिती डिलर्सला दाखवली जात असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर