लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमण वाढू नये याकरिता जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शिकेचे जिल्हा व सत्र न्यायालय इमारत आणि परिसरात सक्तीने पालन करणे बंधनकारक आहे. या मार्गदर्शिकेचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.यासंदर्भात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी गुरुवारी परिपत्रक जारी केले. कोरोना संक्रमण वाढू नये याकरिता महानगरपालिका आयुक्तांनी मार्गदर्शिका जाहीर केली असून शासकीय कार्यालये, सार्वजनिक स्थळे व इतर कामाच्या ठिकाणी त्या मार्गदर्शिकेचे पालन करणे बंधनकारक असल्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, न्यायिक अधिकारी, कर्मचारी, वकील, पोलीस कर्मचारी, पक्षकार आदींनी जिल्हा व सत्र न्यायालय इमारत आणि परिसरात या मार्गदर्शिकेचे सक्तीने पालन करावे, असे निर्देश न्या. मेहरे यांनी दिले आहेत. तसेच, सर्वांनी आपापल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप ठेवणे बंधनकारक आहे असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई : नागपूर जिल्हा न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 22:00 IST
कोरोना संक्रमण वाढू नये याकरिता जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शिकेचे जिल्हा व सत्र न्यायालय इमारत आणि परिसरात सक्तीने पालन करणे बंधनकारक आहे. या मार्गदर्शिकेचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई : नागपूर जिल्हा न्यायालय
ठळक मुद्दे प्रधान न्यायाधीशांचे परिपत्रक जारी