शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

हमीभावापेक्षा कमी दराने दूध खरेदी केल्यास कारवाई : दुग्धविकास मंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 00:36 IST

दूध उत्पादक संघांनी ठरवलेल्या हमीभावातच शेतकऱ्यांंकडून दूध विकत घेण्यात यावे. हमीभावापेक्षा कमी दराने दूध खरेदी करणाऱ्या खासगी व सहकारी संस्थांवर आपत्ती व्यवस्था कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल,असा स्पष्ट इशारा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिला.

ठळक मुद्दे शासन हमीभावाने खरेदी करणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : प्रतिबंधात्मक कारवाईच्या काळात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात होणाऱ्या दूध उत्पादनास मागणीच्या अभावाने अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी व कष्टकरी अडचणीत सापडला आहे. दूध उत्पादक संघांनी ठरवलेल्या हमीभावातच शेतकऱ्यांंकडून दूध विकत घेण्यात यावे. हमीभावापेक्षा कमी दराने दूध खरेदी करणाऱ्या खासगी व सहकारी संस्थांवर आपत्ती व्यवस्था कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल,असा स्पष्ट इशारा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिला.जिल्हा दूध उत्पादक संघाकडे शिल्लक राहिलेले शेतकऱ्यांचे दूध राज्य शासन खरेदी करणार असून, महानंदाच्या माध्यमातून राज्यात आवश्यक दुधाचा पुरवठा करण्याची उपाययोजना करण्यात येईल, असे ते म्हणाले. राज्यातील एकाही शेतकऱ्यांकडे दूध शिल्लक राहणार नाही, याची खबरदारी शासन घेणार आहे. दुधापासून भुकटी बनविण्याचा कारखाना शासन सुरू करणार असून, यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध शासन हमीभावाने खरेदी करेल, असे केदार यांनी सांगितले. दूध घेणाऱ्या खासगी सहकारी व शासकीय संस्थांना राज्य शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने दूध खरेदी करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.दूध, ब्रेड वाहतुकीवर बंदी नाही संचारबंदी काळात दूध, ब्रेड, अंडी, मांस या जीवनावश्यक बाबी असल्याने त्यांची वाहतूक व विक्री यांना प्रतिबंधक यादीतून वगळण्यात आलेले आहे. याविषयी काही अडचणी उद्भवल्यास पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांच्याशी (भ्रमणध्वनी क्रमांक ९४२२८८५५११) किंवा अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन फरकाळे यांच्याशी (भ्रमणध्वनी क्रमांक ९४२३२०७०७०) संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदारMilk Supplyदूध पुरवठा