शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या प्रकरणात अधिकारानुसार कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 19:53 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्रासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीवरील आक्षेप व तक्रारीवर अधिकारानुसार कृती करण्यात आली असे उत्तर निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केले.

ठळक मुद्देनिवडणूक अधिकाऱ्यांचे हायकोर्टात उत्तर : सतीश उके यांनी घेतला प्रत्युत्तरासाठी वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्रासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीवरील आक्षेप व तक्रारीवर अधिकारानुसार कृती करण्यात आली असे उत्तर निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केले.भारतीय निवडणूक आयोगाने उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र अधिकृत वेबसाईटवर अपलोड करून त्याला व्यापक प्रसिद्धी देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार इतरांसह फडणवीस यांचेही प्रतिज्ञापत्र वेबसाईटवर अपलोड करण्यात आले होते. अ‍ॅड. सतीश उके यांनी ३ आॅक्टोबर रोजी फडणवीस यांच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप नोंदवले होते. त्यामुळे उके यांना विरुद्ध प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर उके यांनी ४ आॅक्टोबर रोजी दाखल केलेले विरुद्ध प्रतिज्ञापत्रही वेबसाईटवर अपलोड करण्यात आले. तसेच, उके यांच्या २ आॅक्टोबरच्या तक्रारीची माहिती ४ आॅक्टोबर रोजी फडणवीस यांना कळविण्यात आली. याव्यतिरिक्त अन्य कारवाई करण्याचे अधिकार निवडणूक अधिकाऱ्यांना नव्हते. प्रतिज्ञापत्रातील माहिती खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी चौकशी करण्याचे अधिकार निवडणूक अधिकाऱ्यांना नाही. त्यामुळे उके यांना फडणवीस यांच्या प्रतिज्ञापत्रातील माहितीसंदर्भात काही आक्षेप असल्यास त्यांनी सक्षम प्राधिकाऱ्याकडे जायला हवे असे निवडणूक अधिकाऱ्यांच्या उत्तरात स्पष्ट करण्यात आले.उके या उत्तरावर प्रत्युत्तर दाखल करणार असून त्यासाठी त्यांनी न्यायालयाला दोन आठवड्याचा वेळ मागून घेतला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या प्रकरणात कायद्यानुसार कारवाई झाली नसल्याचा उके यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उके यांनी स्वत:ची बाजू स्वत:च मांडली. फडणवीस यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर तर, निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी व अ‍ॅड. नीरजा चौबे यांनी कामकाज पाहिले.याचिकेतील आरोपफडणवीस यांनी निवडणुकीत खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यांच्याविरुद्धच्या दोन फौजदारी प्रकरणांचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला गेला नाही. ती माहिती त्यांनी जाणीवपूर्वक लपवून ठेवली असे उके यांचे आरोप आहेत. फडणवीस यांच्यावर लोक प्रतिनिधित्व कायद्यातील कलम १२५-ए व फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९५ अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस