शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यपदार्थ विकणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यावर धावत्या रेल्वेत कारवाई - कॅटरिंग ईन्स्पेकटरची कारवाई

By नरेश डोंगरे | Updated: May 3, 2024 23:44 IST

रेल्वे गाड्या अथवा स्थानकावर खाद्य पदार्थ विकण्यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)कडून परवानगी घ्यावी लागते. मात्र, विविध रेल्वे गाड्यांमध्ये अनेक जण कोणतीही परवानगी न घेता दर्जाहिन खाद्यपदार्थ विकून प्रवाशांच्या आरोग्याशी, जिविताशी खेळ करीत असतात.

नागपूर : परवानगी नसताना रेल्वेगाडीत वेगवेगळे खाद्य पदार्थ विकणाऱ्या ८ जणांना अटक करण्यात आली. महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी बडनेरा ते नागपूर दरम्यान रेल्वे केटरिंग इन्स्पेक्टरकडून ही कारवाई करण्यात आली.

रेल्वे गाड्या अथवा स्थानकावर खाद्य पदार्थ विकण्यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)कडून परवानगी घ्यावी लागते. मात्र, विविध रेल्वे गाड्यांमध्ये अनेक जण कोणतीही परवानगी न घेता दर्जाहिन खाद्यपदार्थ विकून प्रवाशांच्या आरोग्याशी, जिविताशी खेळ करीत असतात. त्यांच्यावर अंकूश लावण्याची जबाबदारी आयआरसीटीसीच्या प्रतिनिधींसह केटरिंग इन्स्पेक्टरची असते. मात्र, त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ चालू असतो. असे प्रकार अलिकडे वाढल्याची ओरड उठल्यामुळे शुक्रवारी आयआरसीटीसीचे प्रतिनिधी आणि कॅटरिंग ईन्स्पेक्टरच्या पथकाने बडनेरा येथून महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये तपासणी सुरू केली. वेगवेगळ्या डब्यात खाद्यपदार्थ विकणारे ८ जण त्यांच्या हाती लागले. आम्ही आर अॅन्ड के असोसिएटशी संबंधित अधिकृत खाद्य पदार्थ विक्रेते असल्याचे सांगून त्यांनी तपासणी अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे कागदपत्रे तपासली असता कोणाच कडे मूळ प्रवासी प्राधिकरण किंवा आयआरसीटीसीने जारी केलेले ओळखपत्र नसल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांची कसून विचारपूस केली असता ते अनधिकृत विक्रेते असल्याचे उघड होताच तपासणी पथकाने त्यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ताकिद मिळाल्यानंतर कारवाईविशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात बल्लारशाह, नागपूर स्थानकावरून प्रवाशांना दर्जाहिन आणि शिळी अंडा बिर्याणी खाऊ घालण्यात आल्याने ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाली होती. या प्रकरणाने रेल्वे प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्या कंत्राटदारांना स्वच्छ, ताजे आणि दर्जेदार खाद्य पदार्थ विकण्याच्या सूचना केल्या आहेत. यात काही कमी जास्त झाल्यास कडक कारवाईचा ईशाराही दिला आहे. त्याचप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी तपासण्या करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, ही कारवाई करण्यात आली आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेfoodअन्न