शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

‘ड्राय डे’ च्या दिवशी नागपुरात अवैध दारू तस्करांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 22:57 IST

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी असलेल्या ‘ड्राय डे’च्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या १३ अड्ड्यांवर कारवाई केली.

ठळक मुद्देमानकापूर रोडवर एमपीच्या ३० पेट्या पकडल्या वाडीतून ११ पेट्या जप्त, जिल्ह्यात १३ अड्ड्यांवर धाड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी असलेल्या ‘ड्राय डे’च्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या १३ अड्ड्यांवर कारवाई केली.दुसरीकडे भरारी पथकाने रविवारी रात्री मानकापूर-जरीपटका रोडवर मार्टिननगर चौकात एका कारमधून मध्य प्रदेशातील प्रतिबंधित दारूच्या ३० पेट्या जप्त केल्या. कारसह ८ लाख ५१ हजाराचा माल जप्त केला. पथकाचे निरीक्षक सुभाष खरे यांनी गुप्त माहिती मिळाली होती की, एका निळ्या रंगाच्या कारमध्ये अवैध दारू मोठ्या प्रमाणावर नागपुरात आणली जात आहे. या आधारावर खरे यांनी पीएसआय विश्वाल कोल्हे, धनराज राऊत, प्रकाश मानकर आदीच्या पथकाने मानकापूर चौकात नजर ठेवली. पथकाला मानकापूर चौकातून जरीपटक्याच्या दिशेने एक निळ्या रंगाची कार (एमएच/०१/एवी/६८९२) जाताना दिसली. पथकाने कारचा पाठलाग केला. पोलीस पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच मार्टिननगर चौकात कार चालक व एक साथीदार कार सोडून पळाले. कारची झडती घेतली असता कार चालकाच्या सीटखाली गोवा व्हिस्कीच्या १५ पेट्या सोपडल्या. तसेच कारच्या डिक्कीतही १५ पेट्या ठेवल्या होत्या. फरार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने सोमवारी वाडी परिसरात एकाकडून ७३ हजार रुपये किमतीची दारू पकडली. पोलिसांनी दारूच्या ११ पेट्या जप्त केल्या.अवैध विक्रेत्यावर गुन्हा दाखलपथकाने वाडी परिसरातील एका अवैध दारू विक्रीत सहभागी असलेल्या काटोल रोडवरील तवक्कल ले-आऊट येथील आरोपी गणेश हीरास्वामी नायडू याला अटक केली. त्याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१३ ठिकाणांहून दारू जप्तयासोबतच अबकारी विभागाच्या पथकाने सोमवारी जिल्ह्यातील १३ ठिकाणी धाडी टाकून कारवाई केली. यात २०५ लीटर अवैध दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत हातभट्टीची ८२ लीटर, देशी २७ लीटर, आणि विदेशी ९६ लीटर दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक केशव चौधरी, सुभाष हनवते, सुभाष खरे, सुनील सहस्त्रबुद्धे, दुय्यम निरीक्षक दिलीप बडवाईक, सार धिडसे, रावसाहेब कोरे व पथकाने केली.

टॅग्स :liquor banदारूबंदीraidधाड