शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

नागपुरात  विना हेल्मेट ८८ चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:40 AM

हेल्मेटची सक्ती केलेली असतानाही वापराविषयी उदासीनता दिसून येते. नागरिकांकडून सुरू असलेली टाळाटाळ रोखण्यासाठी आता प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरनेही कंबर कसली आहे. सोमवारी विशेष मोहीम हाती घेऊन ८८ दुचाकी चालकांवर कारवाई केली.

ठळक मुद्देआरटीओची धडक मोहीम : प्रत्येकी ५०० ते २५०० वर वसूल केला दंड

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हेल्मेटची सक्ती केलेली असतानाही वापराविषयी उदासीनता दिसून येते. नागरिकांकडून सुरू असलेली टाळाटाळ रोखण्यासाठी आता प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरनेही कंबर कसली आहे. सोमवारी विशेष मोहीम हाती घेऊन ८८ दुचाकी चालकांवर कारवाई केली. विशेष म्हणजे, अनेक चालकांकडे इन्शुरन्स, पीयूसी नसल्याने दंडाची रक्कम २३०० ते २५०० च्या घरात पोहचली. ही कारवाई पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न केल्याने अपघातात जीव गमवावा लागतो. भरधाव वाहने चालविणारी तरुणाई हेल्मेटच्या वापराविना अपघाताची शिकार ठरत आहे. अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी वेळावेळी वाहतूक विभागाकडून हेल्मेटबाबत विशेष मोहीम राबविली जाते. परंतु त्यानंतरही नियम तोडणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याचे शहरातील चित्र आहे. सोमवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांच्या मार्गदर्शनात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांच्या नेतृत्वात विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यासाठी दोन पथक तयार करण्यात आले होते. एका पथकात मोटार वाहन निरीक्षक नरेश पोलानी व सहायक मोटार वाहन निरीक्षक वासुदेव मुगल तर दुसऱ्या पथकात मोटार वाहन निरीक्षक श्याम कासार व सहायक मोटार वाहन निरीक्षक कोपुल्ला होते. कारवाई करण्यात आलेल्या चालकांमध्ये युवक-युवतींचा मोठा समावेश होता. विशेष म्हणजे, कारवाई दरम्यान हेल्मेटचे ५०० रुपये, इन्शुरन्स नसेल तर एक हजार आणि पीयूसी नसेल तर एक हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला. यामुळे अनेकांचा दंड २५०० वर गेला.‘लोकमत’शी बोलताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे म्हणाले, हेल्मेट हे प्राणरक्षक आहे. आरटीओच्यावतीने याविषयी जनजागृतीही करण्यात आली आहे. परंतु त्यानंतरही अनेक दुचाकी चालक हेल्मेटचा वापर करीत नसल्याने ही कारवाई हाती घेण्यात आली. कारवाई पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचेही आदे म्हणाले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस