शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  ५३ स्कूल बस, व्हॅनवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:01 IST

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने कंबर कसली आहे. गेल्या आठवड्यापासून स्कूल बसची तपासणी मोहीम हाती घेऊन आतापर्यंत ५३ स्कूल बस व व्हॅनवर कारवाई केली. आरटीओच्या या कारवाईने अवैध स्कूल बस व व्हॅनचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देआरटीओची मोहीम : १.२५ लाख रुपयांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने कंबर कसली आहे. गेल्या आठवड्यापासून स्कूल बसची तपासणी मोहीम हाती घेऊन आतापर्यंत ५३ स्कूल बस व व्हॅनवर कारवाई केली. आरटीओच्या या कारवाईने अवैध स्कूल बस व व्हॅनचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.न्यायालयाचा आदेश व परिवहन विभागाच्या निर्देशानुसार शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (आरटीओ) स्कूलबस व स्कूल व्हॅनची वाहन योग्यता तपासणी दरवर्षी करणे बंधनकारक आहे़ उन्हाळी सुट्यांच्या कालावधीत फेरतपासणी करण्याबाबत परिवहन विभागाच्या सूचना आहेत. परंतु स्कूल बसच्या फिटनेसला घेऊन स्कूलबसमालक गंभीर नसल्याचे चित्र आहे. नागपूर शहर आरटीओ कार्यालयांतर्गत ८२६ स्कूल बस नोंदणीकृत आहेत. यातील ६८३ स्कूल बसेसला ‘फिटनेस’ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. उर्वरित १४३ स्कूल बसने अद्यापही हे प्रमाणपत्र घेतले नसल्याने ‘आरटीओ’ कार्यालयाने गेल्याच आठवड्यात त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. परंतु त्यानंतरही या स्कूल बसेस फिटनेस तपासणीसाठी आल्या नाहीत. विशेष म्हणजे, यातील बहुसंख्य स्कूल बसेस विद्यार्थ्यांची ने-आण करीत असल्याने त्या धोकादायक ठरत आहे. या संदर्भाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. याची दखल घेत गेल्या बुधवारपासून स्कूल बस तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत २००वर स्कूल बस व व्हॅनची तपासणी करून दोषी आढळून आलेल्या ५३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातून आरटीओला एक लाख २५ हजाराचा महसूल प्राप्त झाला आहे. आरटीओच्या या धडक कारवाईने स्कूल बसचालकांचे धाबे दणाणले आहे.स्कूल बस तपासणी मोहीम सुरू राहणारस्कूल बस तपासणी मोहीम आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. यात दोषी आढळून येणाºया वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तर योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना नोटीस बजावण्यात आली आहे. लवकरच परवाना निलंबनाच्या कारवाईला सुरुवात होईल.अतुल आदेउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर

टॅग्स :SchoolशाळाRto officeआरटीओ ऑफीस