शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

वैधमापनशास्त्र विभागाची ५६ विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:01 IST

ग्राहकांना वजन कमी मिळत असल्याच्या तक्रारीवरून वैधमापनशास्त्र विभागाने सोमवार आणि मंगळवारी चार बाजारपेठांमध्ये कारवाई करून ५६ विक्रेत्यांकडून दंड वसूल केला आहे. ही कारवाई निरंतर सुरू राहणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देदंड वसूल : कारवाई निरंतर सुरू राहणार

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्राहकांना वजन कमी मिळत असल्याच्या तक्रारीवरून वैधमापनशास्त्र विभागाने सोमवार आणि मंगळवारी चार बाजारपेठांमध्ये कारवाई करून ५६ विक्रेत्यांकडून दंड वसूल केला आहे. ही कारवाई निरंतर सुरू राहणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.चार बाजारपेठांमध्ये कारवाईलोकमतने सोमवारच्या अंकात ‘मापात पाप, किलोभराची भाजी तीन पाव’ या मथळ्याखाली विक्रेते भाजीपाला वा वस्तूंचे मोजमाप वजनकाट्यात दगड ठेवून करीत असल्याच्या छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली होती. सोमवारी बहुतांश बाजारपेठांमध्ये विक्रेत्यांनी कारवाईच्या भीतीने वजनातून दगड हटविले होते. वैधमापनशास्त्र विभागाच्या निरीक्षकांनी कर्मचाऱ्यांच्या चमूसह कळमना, सदर, कॉटन मार्केट आणि फुले मार्केटमधील विक्रेत्यांच्या वजनाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना विक्रेत्यांकडे दगड दिसून आले नाही, पण नियतकालीन स्टॅम्पिंग न केलेली वजने आढळून आली. सर्व वजने जप्त करून त्यांच्याकडून नियमानुसार दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई निरंतर सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.सोमवारी व मंगळवारी पावसामुळे आठवडी बाजारात विक्रेते फार कमी होते. त्यानंतरही चार बाजारपेठांमध्ये ५६ विक्रेत्यांवर कारवाई केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, वजनकाट्यात दगड ठेवून भाजीपाला वा वस्तूंची मोजमाप करणे कायद्याने गुन्हा आहे. विभागाचे अधिकारी नेहमीच बाजारपेठांची पाहणी करून विक्रेत्यांवर कारवाई करीत असतात. कारवाई करताना वजने जप्त करून त्यांच्याकडून दंडही आकारण्यात येतो. शहराच्या विविध भागात बाजारपेठा आहेत, शिवाय आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेत्यांकडून नेहमीच ग्राहकांची फसवणूक करून उल्लंघन करण्यात येते. अशा वेळी ग्राहकांनाही सजग होण्याची गरज आहे. तक्रारीसाठी विभागाने दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर फोन करून ग्राहकांना तक्रार करता येते. तक्रारीची दखल घेऊन संबंधित विक्रेत्याच्या वजनाची पाहणी करण्यात येते. वजनाचे नियतकालीन स्टॅम्पिंग आढळून न आल्यास वजने जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. विभागाने या वर्षात २०० पेक्षा जास्त विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे.ग्राहकांची फसवणूक होऊ नयेवजनात ग्राहकांची फसवणूक होऊ नये, याकरिता वैधमापनशास्त्र विभाग नेहमीच दक्ष असतो. वेळोवेळी बाजारपेठांमधील विक्रेत्यांच्या वजनाची पाहणी करण्यात येते. वजनाची नियतकालीन स्टॅम्पिंग न केलेल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. सोमवार व मंगळवारी ५६ विक्रेत्यांवर कारवाई केली. ही कारवाई निरंतर सुरू राहणार आहे.धनवंत कोवे, उपनियंत्रक,वैधमापनशास्त्र विभाग, नागपूर विभाग.

टॅग्स :nagpurनागपूर